ETV Bharat / state

बलात्काराच्या गुन्हयात ताब्यात असलेला माजी उपनगराध्यक्ष पोलीस ठाण्यातून फरार - अंबरनाथ माजी उपनगराध्यक्ष सुनील वाघमारे बलात्काराचा गुन्हा

पीडित महिला आरोपी सुनील वाघमारे यांच्या घरी लॉकडाऊनच्या काळात अन्न-धान्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही दोन वेळा आरोपी वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचे म्हणणे आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला, मात्र, पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे पीडितेने अर्जात म्हटले आहे. तसेच, याबाबत वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी वाघमारे याने दिल्याचे महिलेने म्हटले आहे.

ठाणे लेटेस्ट क्राईम न्यूज
ठाणे लेटेस्ट क्राईम न्यूज
author img

By

Published : Dec 2, 2020, 4:49 PM IST

ठाणे - अंबरनाथ नगरपालिकेचा माजी उपनगराध्यक्षाविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने तो राहत असलेल्या परिसरातील एका महिलेवर लॉकडाऊन काळात व त्यानंतर धान्य देण्याच्या बहाण्याने बलात्कार केल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा बलात्काराचा दाखल करण्यात आला. मात्र, दिवसभर पोलीस ठाण्यात बसलेला बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपी हा काल रात्री अचानक पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सुनील वाघमारे असे फरार झालेल्या आरोपीचे नाव आहे.

हेही वाचा - योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात ट्रायडंट हॉटेलबाहेर राष्ट्रवादीचे आक्रमक आंदोलन

लॉकडाऊनच्या वेळी धान्य देण्याच्या बहाण्याने बलात्कार

पीडित महिला आरोपी सुनील वाघमारे यांच्या घरी लॉकडाऊनच्या काळात अन्न धान्य घेण्यासाठी गेली होती. त्यावेळी संधीचा फायदा घेऊन त्याने आपल्याशी गैरवर्तन करून संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप महिलेने केला आहे. त्यानंतरही दोन वेळा आरोपी वाघमारे याने आपल्याशी संबंध ठेवल्याचे महिलेचे म्हणणे आहे. घटनेनंतर काही दिवसांनी पीडित महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार करायचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याचे पीडितेने अर्जात म्हटले आहे. त्याचबरोबर याबाबत कुठेही वाच्यता केली तर वाघमारेने जीवे ठार मारण्याची धमकी दिली. अखेर मंगळवारी रात्री उशिरा सुनील वाघमारे यांच्याविरोधात बलात्काराचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे.

आरोपी पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याने उडाला गोंधळ

धक्कादायक बाब म्हणजे दुपारपासून ही महिला तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात येऊन बसली होती. त्याचवेळी आरोपी सुनील वाघमारे याला चौकशीसाठी पोलोसांनी पोलीस ठाण्यात आणून बसवले होते. मात्र, रात्री अचानक सुनील वाघमारे पोलीस स्टेशनमधून पसार झाल्याने मोठा गोंधळ उडाला. सुनील वाघमारे पोलीस ठाण्यातून कोणाला विचारून बाहेर गेला किंवा त्याला बाहेर जाण्यास कोणी मदत केली, याचा शोध पोलिसांकडून केला जात आहे.

हेही वाचा - मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आक्रमक; महावितरण अधिकाऱ्यांच्या अंगावर फेकल्या फाईल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.