ETV Bharat / state

Ambarnath holi Incident : मित्र रंग लावण्याच्या भीतीने गच्चीत लपला; मात्र तोल गेल्याने खाली पडून झाला मृत्यु

author img

By

Published : Mar 19, 2022, 12:37 PM IST

धुळवडीला मित्र रंग लावतील या भीतीने एक तरुण इमारतीच्या गच्चीमध्ये जाऊन लपला. मात्र याच इमारतीच्या डक्टमधून खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली ( Ambarnath holi Incident ) आहे. सूरज मोरे (वय २६) असे यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

Ambarnath holi Incident
इमारतीवरून पडून तरुणाचा मृत्यू

ठाणे - धुळवडीला मित्र रंग लावतील या भीतीने एक तरुण इमारतीच्या गच्चीमध्ये जाऊन लपला. मात्र याच इमारतीच्या डॅक्टमधून खाली पडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अंबरनाथमध्ये ( Ambarnath holi Incident ) घडली आहे. सूरज मोरे (वय २६) असे यात मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.

दोघेही इमारतीत पळाले -

अंबरनाथ शहरातील शिवाजीनगर भागात मृत सुरज कुटूंबासह राहत होता. धुळवडीच्या दिवशी सुरज हा त्याचा भाऊ तुषार मोरे याच्यासह दुपारच्या सुमारास अविनाश पाटील या मित्राला भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर नव्याने झालेल्या इमारतीत अविनाश वास्तव्याला असून याच इमारतीखाली हे तिघे बोलत उभे होते. यावेळी त्यांच्याच परिसरातले इतर काही मित्र तिथून जात असताना त्यांना मृत सूरज आणि तुषार दिसल्याने ते त्यांना रंग लावण्यासाठी आले. यावेळी सूरज आणि तुषार हे दोघेही इमारतीत पळाले. तुषार हा पहिल्या मजल्यावर लपला, तर सूरज हा थेट गच्चीत जाऊन लपला. यावेळी तुषार याला मित्रांनी पकडून खाली आणलं, त्याला रंग लावत असतानाच अचानक सूरज हा गच्चीतून खाली पडला.

पोलिसांनी केली अकस्मात मृत्यूची नोंद -

इमारतीच्या टेरेसवर असलेल्या डक्टमधून सूरज खाली पडला आणि त्याच्या पायाला दुखापत झाली. यानंतर त्याच्या भावाने आणि मित्रांनी तातडीने आधी अंबरनाथच्या एका खासगी रुग्णालयात, तिथून उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात आणि तिथून उल्हासनगरच्या खासगी रुग्णालयात सूरजला नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. या घटनेमुळे मोरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

हेही वाचा - Accident In Solapur : दुर्दैवी! यल्लमा देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तीन युवकांचा अपघातात मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.