ETV Bharat / state

Jitendra Awhad : आव्हाडांच्या मनधरणीसाठी अजित पवार, जयंत पाटील ठाण्यात; आव्हाड झाले भावुक - Jitendra Awhad resignation

ड्डाण लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी करत आपण आपल्या आमदारकीचा राजीनामा देत ( Jitendra Awhad resignation ) आहोत, असे ट्विट केले. जितेंद्र आव्हाड यांच्या समजुतीसाठी विरोधी पक्षनेत अजित पवार पुण्यावरून तर राष्ट्रवादीचे जयंत पाटील ठाण्यात आले.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 14, 2022, 10:18 PM IST

ठाणे : उड्डाण लोकार्पण सोहळ्यात राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंब्रा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माझ्यावर ७२ तासात दोन खोटे गुन्हे दाखल केले असून एकवेळ खून किंवा इतर कोणताही गुन्हा मी पाचवला असता मात्र विनयभंगासारखा गुन्हा मला सहन होत नाही, असे म्हणत आव्हाड यांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा ( Jitendra Awhad resignation ) दिला आहे.

तक्रारदार महिलेचा सन्मान करतो - माझ्या राजकीय आयुष्यात मी अस कधी असे केले नाही. त्यामुळें तरीही पोलिसांनी हा गुन्हा कसा दाखल केला हे कळत नाही, असे म्हणत तक्रारदार महिलेचा मी सन्मान करत असून 'लाव रे तो व्हिडीओ' च्या माध्यमातुन आव्हाड यांनी छटपूजेच्या दिवशी त्याच महिलेला भगिनी म्हणून केलेला व्हिडीओ भर पत्रकार परिषदेत दाखवला.

शिंदे विरुद्ध आव्हाड वाद निर्माण करण्याचा प्रयत्न - दरम्यान आव्हाडांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे सांगली वरून तर विरोधी पक्ष नेते अजित पवार हे पुण्याहून आव्हाडांची समजूत काढण्यासाठी ठाण्यात आले होते. महाराष्ट्राचे राजकारण वेगळ्याच दिशेला जात असून खालच्या पातळीचे राजकारण होऊ नये म्हणून सर्वांनी प्रयत्न केले पाहिजे असे यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगीतले. त्याच महिलेला भगिनी आव्हाड काही दिवसापर्वी बोलतात आणि आता विनयभंग गुन्हा दाखल होतो आच्छर्य वाटत आहे. सरकार आणि पोलिसांना प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. जाणीवूर्वक गुन्हेगार ठरवयाचे काम सुरू आहे. मुख्यमंत्र्याच्या डोळ्यासमोर पोलीस अधिकारी खेटुन उभा आहे. कायद्याचा चुकीचा वापर सुरू असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले. शिंदे विरुद्ध आव्हाड अस चित्र निर्माण करण्याचे काम सुरू असून मुख्यमंत्र्यानी सदसदविवेक बुद्धीने निर्णय घ्यावा, अशी मागणी पाटील यांनी केली.

या प्रकरणाची संपूर्ण चौकशी व्हावी - तक्रारदार महिलेला गुन्हा दाखल करण्याचा दबाव होता का ? हे प्रकरण रात्री झाले त्यानंतर ती महिला मुख्यमंत्र्यांना भेटते आणि त्यानंतर गुन्हा दाखल केला जातो. त्यामुळे या प्रकरणाची संपूर्ण चौकशी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी यावेळी केली. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयंत्न केला जात असून आव्हाडांना नैराश्य आले आहे. त्यामुळे मी थेट पुण्याहून आव्हाडांची समजूत काढण्यासाठी ठाण्यात आलो. आव्हाडांनी केलेले ट्वीट त्यांनी मागे घ्यावे, अशी विनंती राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आव्हाडांना केली.

अजित पवार पुण्यावरून ठाण्यात - राज्याचे माजी मंत्रावर ७२ तासात दोन दोन गुन्हे दाखल होतात आणि ते हि खोटे. आव्हाड हे लढणारे कार्यकर्ते असून शाहु,फुले आंबेडकरांचा विचार पुढे नेणारे नेते आहेत. मुख्यमंत्री, पोलीस समोर असताना विनयभंग झालेला त्या व्हिडिओ मध्ये दिसत नाही. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे लाजिरवाणी गोष्ट आहे. हे षडयंत्र आहे, का असा सवाल यावेळी पवार यांनी उपस्थित केला. वस्तुस्थिती काय आहे, ते जाणुन घेण्यासाठी मी बारामती पुण्याहुन इथे आलोय. कायद्याचा आधार घेऊन निष्पाप लोकाना गोवणे घटनेला देखील धरून नाही. अनेक वर्ष गृहखाते आमच्याकडेही होते त्यावेळी कधी दुरुपयोग आम्ही केला नाही. आव्हाडांनी आपले ट्विट मागे घ्यावेत, अशी विनंती अजित पवार यांनी केली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.