ETV Bharat / state

कल्याणहून तब्बल २२ तासानंतर बदलापूरसाठी पहिली लोकल

author img

By

Published : Jul 27, 2019, 11:34 PM IST

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूकच ठप्प झाली होती. आता तब्बल २२ तासानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

फाईल फोटो

ठाणे - गेल्या ४ दिवसांपासून मुसळधार पावसाने मुंबईसह उपनगरात हजेरी लावली आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री कल्याण ते बदलापूरदरम्यान मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती. आता रुळावरील पाणी कमी झाले आहे. त्यामुळे तब्बल २२ तासानंतर कल्याणहून बदलापूरसाठी पहिली लोकल सोडण्यात आली आहे.

विशेष म्हणजे बदलापूर, विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकात पावसाचे पाणी रेल्वे रूळावर साचल्याने या मार्गावरील रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. जवळपास रात्री दीड वाजल्यानंतर उशिराने रेल्वे वाहतूक सुरू करण्यात आली. मात्र, रात्रीच्या पावसाचा परिणाम सकाळीही रेल्वे वाहतुकीवर दिसून आला. रेल्वेच्या सर्वच गाड्या २० ते ३० मिनिटे उशिरा धावत होत्या. त्यानंतर मध्य रेल्वेची संपूर्ण वाहतूकच ठप्प झाली होती. आता तब्बल २२ तासानंतर ही वाहतूक सुरू करण्यात आली आहे.

Intro:22 तासानंतर कल्याणहून बदलापूर साठी पहिली लोकल सुटली*

*दिवसभरापेक्षा आता रेल्वे रुळावरील पाणी कमी*

*प्लॅटफॉर्मवर प्रवाशांची गर्दी*

*लोकल पकडण्यासाठी लोकांची धडपड*
Body:बातमी थोड्याच वेळात Conclusion:बातमी थोड्याच वेळात
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.