ETV Bharat / state

त्रस्त प्लॅटधारकांचे बांधकाम विकासकाच्या कार्यलयावर आंदोलन - ठाणे सदनिका बातमी

अंबरनाथ शहरातील बांधकाम विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिका ग्राहकांना विक्री करताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन ते चार वर्षांपासून प्यायला पाणी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे अंबरनाथच्या पालेगाव आणि गायकवाड पाडा परिसरातील त्रस्त नागरिकांनी जे. पी. बिल्डरच्या कार्यलयाला घेराव घालत मोठे आंदोलन छेडले. त्यानंतर जे पी बिल्डर किरण पटेल यांनी जे काही तुमच्या समस्या आहेत त्या तत्काळ सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

आंदोलक
आंदोलक
author img

By

Published : Jan 19, 2021, 7:55 PM IST

Updated : Jan 19, 2021, 10:34 PM IST

ठाणे - अंबरनाथ शहरातील बांधकाम विकासकांनी लाखो रुपयांच्या सदनिका ग्राहकांना विक्री करताना विविध सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन ते चार वर्षांपासून प्यायला पाणी उपलब्ध करून दिले नाही. त्यामुळे अंबरनाथच्या पालेगाव आणि गायकवाड पाडा परिसरात जे. पी. बिल्डर विरोधात त्रस्त प्लॅटधारकांनी जे पी बिल्डर फ्रँडच्या घोषणा देत, त्यांच्या कार्यलयावर मोर्चा काढला होता. मात्र, बांधकाम विकासकाने मोर्चेकरांना लेखी आश्वासन देऊन जे काही तुमच्या समस्या आहेत त्या तत्काळ सोडवण्याचे प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. त्यांनतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

त्रस्त प्लॅटधारकांचे बांधकाम विकासकाच्या कार्यलयावर आंदोलन

सदनिकाधारक अनेक समस्यांनी त्रस्त

अंबरनाथमध्ये घर घेत असाल तर जरा सावधान बांधकाम विकासक करतील आपली फसवणूक असा प्रचारही या परिसरात राहणाऱ्या त्रस्त सदनिकाधारकांनी सुरू केला आहे. त्यातच नवीन घर घेताना बांधकाम विकासक सदनिका घेणाऱ्या ग्राहाकांना विविध सुखसोयी उपलब्ध करून देण्याचे आश्वसन देत असतात. मात्र, त्या आश्वसनाची पूर्तता कदाचितच काही बांधकाम व्यवसायिक करीत असतील. असेच काहीसे अंबरनाथ मधील वार्ड क्रमांक 56 येथील पालेगाव रोड गायकवाड पाडा याठिकाणी नव्याने निर्माण झालेली जे. पी. सॅमफोनी या इमारतीत घडले आहे. येथील सदनिकाधारकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. याठिकाणी पिण्यासाठी पाणीच नसून टँकरद्वारे पाणी पुरवठा होतो. सोसायटीच्या मेंटेनन्समध्ये घोटाळा झाल्याचा आरोप ही सदनिकाधारक करत आहे. बिल्डर दोन वर्षांसाठी सदनिकाधारकांकडून 20 हजार रुपये मेन्टेन्स घेतले आहे. परंतु बिल्डर आता एक वर्षांसाठी मेन्टेन्स घेतल्याचे सांगत आहे. मागील दोन ते तीन वर्षांपासून या इमारतीला पिण्याचे पाणी नाही. बिल्डर फक्त आश्वासन देत असल्याने आज सदनिकाधारकांनी परिसरात पोस्टरबाजी करून बांधकाम विकासकाविरोधात घोषणाबाजी केली आहे. त्यांनतर येथील प्लॅटधारक एकत्र येत त्यांच्या ऑफिसवर मोर्चा वळवला होता.

घर घेणाऱ्या गरजू नागरिकांची फसवणूक

गेल्या 15 वर्षापसून अंबरनाथमध्ये जमिनीचे भाव गगनाला भिडले आहे. त्यामुळे स्थानिक भूमिपुत्र हे शेत जमीनी या बिल्डरला डेव्हलपमेंटला देत आहे. मात्र, येथील बांधकाम विकासक स्वतःच्या फायद्यासाठी घर घेणाऱ्या गरजू नागरिकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले आहे. अंबरनाथ शहरातील शिवमंदिरच्या मागील बाजूस काही वर्षात अनेक टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या आहेत. सध्या याठिकाणी चार ते पाच हजार नागरिकांची लोकवस्तीही झाली आहे. बहुतांश नागरिकांनी कर्ज काढून या ठिकाणी घर खरेदी केली आहेत. परंतु त्या घरात राहण्यासाठी आल्यावर त्यांची फसवणूक झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

लेखी आश्वासनानंतर आंदोलन मागे

या सदनिकाधारकांनी जे. पी. बिल्डरच्या कार्यलयाला घेराव घालत मोठे आंदोलन छेडले. त्यानंतर जे पी बिल्डर किरण पटेल यांनी जे काही तुमच्या समस्या आहेत त्या तत्काळ सोडवण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हेही वाचा - ठाणे : गंभीर गुन्हे घडलेल्या चारही ग्रामपंचायतीचे निकाल 'धक्का' देणारे..

हेही वाचा - डी-मार्टच्या लिफ्टमध्ये अडकलेल्या दोन लहान मुलांसह १३ जणांना केले रेस्क्यू

Last Updated : Jan 19, 2021, 10:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.