ठाणे : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बंड केले. शिवसेनेच्या इतिहासात इतका मोठा फटका या पुर्वी कधी बसला नव्हता. मुंबई सोबतच ठाणे हा तत्कालीन शिवसेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. तो कायम ठेवण्यासाठी ठाकरे आणि शिंदे दोघांमधे चढाओढ पहायला मिळत आहे. यातच एका पदाधिकारी महिलेला झालेल्या मारहाणी नंतर उद्धव आणि ठाकरे कुटुंबियांनी त्या महिलेची भेट घेतली आणि मारहान करणाऱ्या सत्ताधारी गटाच्या कार्यकर्त्यांवर कारवाईची मागणी केली. याच मुद्यावरून आदित्य ठाकरेंनी तेथे महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते.
आदित्यचे खुले आव्हान : आदित्य ठाकरे ठाण्याचे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वात निघालेल्या मोर्चाला ठाणेकरांनी जोरदार प्रतिसाद दिला. मुख्यमंत्री पदी विराजमान झाल्यानंतर ठाकरे गट विरूद्ध शिंदे गट असा सामना वरचेवर रंगताना पहायला मिळत आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात मी निवडणूक लढायला तयार आहे असे आदित्य यांनी सुनावले. मी लढणार आणि जिंकूनही दाखवणार, असे खुले आव्हान आदित्य ठाकरे यांनी बुधवारी दिल्याने ठाकरे गटामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
म्हणुन ठाण्यातुन यात्रा : या मोर्चांच्या निमित्ताने ठाकरे गटाच्या बाजुने उभा झालेली गर्दी, त्यांना मिळणारी सहानभुती पाहता शिंदेंनी आपल्या आयोद्धा दौऱ्याच्या निमित्ताने ठाण्यातून राम भक्त मतदारांना आयोद्धेची सहल घडवण्यासाठी शिंदेंनी मतदारांसाठी ठाण्यातुन या यात्रेचे आयोजन केल्याचे सांगण्यात येत आहे. या निमित्ताने शिंदे हे ठाण्यातील आपला बालेकिल्ला कायम ठेवण्यासाठी आत्तापासून प्रयत्न करताना दिसत आहेत. या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करत आदित्यच्या आव्हानालाही छेद देण्याचे काम त्यांनी केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.
शिंदेंनी विरोधक संपवले : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ठाण्यातील कोपरी पाचपाखाडी विधानसभा क्षेत्रातून प्रतिनिधित्व करत आहेत. गेली ४ टर्म एकनाथ शिंदे या विधानसभेतून भरघोस मतांनी विजयी झाले आहेत. कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदार संघ तसा बहुभाषिक मतदार संघ म्हणून ओळखला जातो. या मतदार संघात कोकणी, पश्चिम महाराष्ट्र बरोबर उत्तर भारतीय, काही प्रमाणात परप्रांतीय लोक वास्तव्य करत आहेत. या मतदारसंघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याची चांगलीच पकड असून शिंदे यांनी आपला बालेकिल्ला भक्कम बांधला आहे. दरम्यान आदित्य ठाकरेंनी आव्हान दिल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ठाण्यात शिवसेनेचे मतदार : महाराष्ट्राची सत्ता बदलल्या नंतर एकनाथ शिंदे यांनी जुन्या शिवसैनिकांना शिंदे गटात प्रवेश दिला असला तरीही ठाण्यातील दोन जुन्या जाणत्या नेत्यांनी उध्दव ठाकरे यांची साथ सोडली नाहीय सुभाष भोईर राजन विचारे केदार दिघे आणि जुन्या नगरसेवकांची टीम ही सोबत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांना मतदान होणार हे नक्की आणि यांचीच भीती असल्यामुळे एकनाथ शिंदे यांना सहज रित्या पालिकेवर आणि विधानसभा निवडणुकीत यश मिळेल असे वाटत नाही.
मारहाण प्रकरणानंतर मिळणार सहानुभूती : महाराष्ट्राच्या सत्तांतरानंतर ठाण्यात अनेक वेळा उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे यांचा गट एकमेकांना भेटला यावेळी झालेल्या मारहाणीत उद्धव ठाकरे गटांवर अन्याय झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. त्यामुळे गुंडांचा वापर पोलिसांची दादागिरी एकूणच सत्तेमुळे आलेलं पोलीस संरक्षण यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात चिडले असून समोर जरी आले नाही, तरी मतदान स्वरूपात उद्धव ठाकरे यांना पाठिंबा मिळणार आहे.