ETV Bharat / state

नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३२ दुकानदारांवर कारवाई; दुकाने सील - नियमांचे उल्लंघन दुकानदारावर कारवाई

आयुक्त देशमुख यांच्या आदेशानुसार, रविवारी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, सम-विषम तारखांना दुकाने उघडे ठेवण्यासाठीचे नियम, अटी-शर्थीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रभागातील प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, प्रकाश गायकवाड, अरूण कोळी व सदाशिव कवठे यांच्या पथकांनी 32 दुकानदारावर कारवाई केली.

Action On 32 Shopkeepers In Violation Of Rules
नियमाचे उल्लंघन करणाऱ्या ३२ दुकानदारावर कारवाई; दुकाने सील
author img

By

Published : Jun 22, 2020, 7:49 AM IST

नवी मुंबई - अनलॉक-१ मध्ये काही दुकानदार फिजीकल डिस्टन्सिंगचे पालन करत नसल्याचे समोर आले होते. तेव्हा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अशा दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार संबंधित अधिकाऱ्यांनी फिजिकल डिस्टन्सिंगच्या नियमाचे पालन न करणाऱ्या, ३२ दुकानदारावर कारवाईचा बडगा उगारला आहे.

मिशन बिगिन अगेन अंतर्गत लाॅकडाऊन शिथील झाल्यापासून नागरिक मुक्त झाल्यासारखे दिसत आहेत. मात्र लाॅकडाऊन शिथील करताना फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे व कोरोना संसर्ग होऊ नये, यासाठी मास्क व सॅनिटायझर्स यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे, असे वारंवार प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. तसेच नागरिकांनी गर्दी न करता दैनंदिन जीवन सुरळीत करणे अपेक्षित आहे. परंतु या बाबीचे भान ठेवता काही दुकानदार बेजबाबदारपणे वागत असल्याने निदर्शनात आले. तेव्हा आयुक्त सुधाकर देशमुख यांनी अशा दुकानदारांवर सक्त कारवाई करण्याचे आदेश काढले.

आयुक्त देशमुख यांच्या आदेशानुसार, रविवारी उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन, सम-विषम तारखांना दुकाने उघडे ठेवण्यासाठीचे नियम, अटी-शर्थीचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात आली. संबंधित प्रभागातील प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी, प्रकाश गायकवाड, अरूण कोळी व सदाशिव कवठे यांच्या पथकांनी 32 दुकानदारांवर कारवाई करत दुकाने सील केली.

अतिक्रमण पथकांमार्फत आता दररोज ही कारवाई केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर साथरोग अधिनियम 1897 नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. दरम्यान, दुकानदारांसह नागरिकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी केले आहे.

हेही वाचा - 'चायनासे देश बचाव'... ठाण्यातील चायनीज प्रकल्पाविरोधात मनसेचे आंदोलन

हेही वाचा - ऐकावे ते नवलच... ‘मॅगी‘वरून पती-पत्नीत हाणामारी, पत्नीचा हात फ्रॅक्चर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.