ठाणे (मिरा भाईंदर): भाईंदर पूर्वच्या 'आर.एन.पी. पार्क' परिसरात राहणारे धीरज परमार आणि यांच्या पत्नी मनीषा परमार हे 'रियल इस्टेट'चा व्यवसाय करतात. आरोपीने भाडेतत्त्वावर खोली घेण्याच्या नावाने मनीषा परमार यांची भेट झाली होती. यावेळी त्याने परमार यांच्या घराची रेकी करत यांच्या घराच्या चावी चोरी केल्या होत्या. परमार कुटुंब लग्नासाठी बाहेर जाणार असल्याची माहिती आरोपीला मिळाली होती. त्याने ही संधी साधून परमार यांच्या घरात प्रवेश केला आणि 2 लाख 65 हजार रुपयांची रोख रक्कम चोरी केली.
तांत्रिक तपासाद्वारे आरोपीस अटक: 10 मे रोजी सकाळी मोलकरीण परमार यांच्या घरी आली तेव्हा घरातील वस्तू, कपाटातील तिजोरी अस्ताव्यस्त पडलेले तिला आढळले. यानंतर मोलकरनीने घरमालक परमार यांना याची माहिती दिली; मात्र फिर्यादी लग्नकरिता बाहेर गेल्याने ११ मे रोजी नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली गेली. त्यानंतर पोलिसांनी सर्व परिसरातील सीसीटीव्ही, तांत्रिकदृष्ट्या तपास करून घरफोडी करणाऱ्या चेतन मोकाशी (रा. विटावा पूर्व, ठाणे) यास अटक केली. आरोपीकडून चोरीला गेलेला सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला अशी माहिती उपायुक्त जयंत बजबळे यांनी दिली.
'या' पोलिसांनी घेतला कारवाईत सहभाग: ही कारवाई नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार, सुशील कुमार शिंदे (गुन्हे), स.पो.नि योगेश काळे, पो.उप.नि अभिजीत लांडे, पो.हवा भूषण पाटील, सुरेश चव्हाण, नवनाथ घुगे, ओमकार यादव, सुरजीत गुनावत यांनी केलेली आहे.
बिल्डरच्या घरी चोरी: पुण्यातील सेनापती बापट रस्त्यावर राहणाऱ्या एका बड्या बिल्डरच्या सेक्युरिटी गार्ड आणि त्यांच्या दोन साथीदारांनी घरातील मागील दरवाजा तोडून तब्बल 79 लाखांची चोरी केली आहे. या बाबत पुण्यातील चतुःश्रुंगी पोलीस ठाण्यात प्रितम राजेंद्र मंडलेचा (वय ३५ वर्षे) यांनी तक्रार दाखल केली आहे.
कुलुप तोडून केली चोरी: याबाबत पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आले की, 6 मे रोजी रात्री 8 ते 10 वाजल्याच्या दरम्यान फिर्यादीच्या राहत्या घराचे पाठीमागच्या दरवाजाचे कुलूप तोडले गेले. यानंतर त्यांचा सिक्युरीटी गार्ड झंकार बहादुर सौद (रा. नेपाळ) आणि त्याचे इतर दोन साथीदारांनी घराचे आतमध्ये प्रवेश केला. आरोपींनी तब्बल 79 लाखाचे पैसे आणि दागिने चोरून नेले.
हेही वाचा: