वसई - तामिळनाडूतील तंजावर जिल्ह्यात 'सेक्रेड हार्ट' या ( Tamilnadu Conversion Case ) उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या ( Tamilnadu M Lavanya Suicide ) हिने विष पिऊन आत्महत्या केली. तिने मृत्यूपूर्वी दिलेल्या स्टेटमेंटमध्ये शाळेतील शिक्षिका रेकलीन मेरी व सगया मेरी यांनी तिच्यावर गेल्या २ वर्षापासून ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करण्यासाठी त्रास दिल्यामुळे ती आत्महत्या करत असल्याचे म्हटले आहे.
शिक्षकांनी केला मानसिक छळ -
एम.लावण्या ही ख्रिश्चन धर्मात धर्मांतरण करत नसल्यामुळे तिला शौचालय साफ करणे, झाडू मारणे, भांडी धुवायला लावणे, अशी शाळेतील कामे लाऊन शिक्षकांनी तिचा मानसिक छळ केला. भारतीय राज्यघटनेने धार्मिक स्वातंत्र्य दिलेले असताना अशा प्रकारे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शाळेच्या माध्यमातूनच धर्मांतरण करायला लावणे, हे निंदनीय आणि संतापजनक आहे, अशी अभाविपच्यावतीने देण्यात आली आहे.
'तोपर्यंत अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करेल' -
एम.लावण्या हिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या आरोपींना जामीन मंजूर झाल्यानंतर कारागृहाबाहेर तमिळनाडू सरकारमधील मंत्र्यांकडून आरोपींचे स्वागत करणे, हे देखील संतापजनक आहे. अभाविपच्या राष्ट्रीय महामंत्री निधी त्रिपाठी या तमिळनाडू येथे लावण्याच्या न्यायासाठी आंदोलन करत असताना त्यांना व अभाविप कार्यकर्त्यांना दडपशाही पद्धतीने अटक करण्यात आली. या घटनेतील संबंधित आरोपींवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी अभाविपच्यावतीने आज वसई स्टेशन मनपा येथे 'रास्ता रोको' आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत एम.लावण्या हिला न्याय मिळत नाही तोपर्यंत अभाविप रस्त्यावर उतरून संघर्ष करेल, असा इशारा अभाविपने दिला.