ETV Bharat / state

धक्कादायक! नायर रुग्णालयातून पसार झालेला 'तो ' कोरोनाबाधित भिवंडी रुग्णालयाच्या बाहेर फिरताना आढळला - thane corona news

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती (कोव्हिड-19) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्या रुग्णाविरोधात तक्रार देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु हा पॉझिटिव्ह रुग्ण नायर रुग्णालयात दाखल असताना बाहेर आलाच कसा? त्याला भिवंडीपर्यंत कोणी आणून सोडले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.

author img

By

Published : Apr 27, 2020, 5:53 PM IST

ठाणे - भिवंडी शहरातील ५१ वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मुंबईतील नायर रुग्णालयातून थेट भिवंडीपर्यंत प्रवास करून स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाच्या बाहेर वावरत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णालयालगत भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या नागरिकांना हा रुग्ण दिसल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून त्यांनीच ही गंभीर बाब डॉक्टरांच्या निर्दशनास आणून दिली. यानंतर त्या रुग्णाला भिवंडीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक! नायर रुग्णालयातून पसार झालेला 'तो ' कोरोनाबाधित भिवंडी रुग्णालयाच्या बाहेर फिरताना आढळला

सदर घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने हा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी भिवंडीतील स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती (कोव्हिड-19) रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात त्या रुग्णाविरोधात तक्रार देऊन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. परंतु हा पॉझिटिव्ह रुग्ण नायर रुग्णालयात दाखल असताना बाहेर आलाच कसा? त्याला भिवंडीपर्यंत कोणी आणून सोडले, असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, या प्रकारानंतर रुग्णालयालगत भिवंडी महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतीत राहणाऱ्या सुमारे दोनशे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या रुग्णाचा इतिहास पाहता हा भिवंडीत राहणारा असून २२ एप्रिलच्या पहाटे या ५१ वर्षीय किडनी विकाराने त्रस्त रुग्णाचा खासगी लॅबच्या अहवालानुसार कोरोना पॉझिटिव्ह आढळून येताच भिवंडी महानगरपालिका आरोग्य विभागाच्या पथकाने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती (कोव्हिडं 19) या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र या रुग्णास डायलेसिस आवश्यक असल्याने २२ एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता भिवंडीतून त्याला मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले होते. त्यावेळी रुग्णाची भाचीसुद्धा त्यासोबत नायर रुग्णालयात गेली. यामुळे तिला क्वारंटाईन सेंटरमध्ये दाखल केले आहे. त्यानंतर २३ एप्रिल रोजी सायंकाळच्या सुमारास हा रुग्ण भिवंडीतील इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय व नजीकच्या कर्मचारी वसाहत परिसरात सुमारे पाऊण तास घुटमळताना दिसून आला. त्यावेळी महानगरपालिका कर्मचारी वसाहतीमधील काही रहिवाशांना तो कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याबद्दल खात्री पटली होती. त्यांनी तत्काळ डॉक्टरांशी संपर्क साधून वस्तुस्थिती सांगितली असता त्याची इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयात रवानगी केली.

खळबळजनक बाब म्हणजे इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले आहे. त्या इमारतीच्या मागील बाजूच्या प्रवेशद्वाराने रुग्णांना रुग्णवाहिकेतून आणले जात आहे. या रस्त्यालगत महानगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या तीन इमारतींमध्ये एकूण ४८ कुटुंबीय वास्तव्यास असून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पॉझिटिव्ह रुग्ण परिसरात फिरत असल्याने त्यांनी भीती व्यक्त करीत रुग्णालय प्रशासन त्यावर लक्ष ठेवत नसल्याचा आरोप केला आहे.

दरम्यान, नायर येथून रुग्णवाहिकेतून ठाणे येथे आला व तेथून पुढे एका ट्रकमध्ये बसून भिवंडी बायपास रस्त्यावरील राजनोली नाका या ठिकाणी उतरल्यावर तो पायीच स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयापर्यंत पोहोचला. त्यानेच ही माहिती दिल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. नायर रुग्णालयात दाखल असलेला हा रुग्ण रुग्णालयाच्या बाहेर पडलाच कसा? त्याच्याकडे ट्रान्स्फर लेटर नव्हते, मग तेथील सुरक्षारक्षकाने त्याला अडविले कसे नाही? त्याला रुग्णवाहिका कोणी दिली व रुग्णवाहिका चालक त्याला रस्त्यावर उतरवून गेला कसा? असे अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. शिवाय त्याने केलेल्या नायर ते भिवंडी दरम्यानच्या प्रवासात त्याच्याशी संपर्कात आलेल्याना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याप्रकरणी स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिल थोरात यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.