ETV Bharat / state

Thane crime news : आधारवाडी कारागृहात कैद्यांकडे १५ मोबाईल प्रकरणी कारागृह अधीक्षक निलंबित - कैद्यांकडे १५ मोबाईल सापडले

ठाणे जिल्ह्यातील आधारवाडी कारागृहात कैद्यांकडे १५ मोबाईल सापडले होते. या प्रकरणी कारागृह अधीक्षकांना निलंबित करण्यात आले आहे.

अंकुश सदाफुले
अंकुश सदाफुले
author img

By

Published : Jul 12, 2023, 5:38 PM IST

ठाणे - कल्याण पश्चिम भागात असलेल्या आधारवाडी कारागृहातील अनेक बंदीवान कैद्यांकडे जेल बॅरेकमध्ये मोबाईल आढळून आले होते. याप्रकरणी कल्याण खडकपाडा पोलीस ठाण्यात गुन्हेही दाखल करण्यात आले. आता या मोबाईल प्रकरणाचा पोलीस तपास संपल्यानंतर आधारवाडी कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कारागृहातील कैद्यांकडे मोबाईल सापडल्यानंतरही सदाफुले यांनी ठोस कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई केल्याचे सांगितले जात आहे.

तुरुंगात होतात अनेक गैरप्रकार - कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कधी कैद्यांच्या दोन गटात हाणामारी तर कधी कारगृहातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार यापूर्वी घडले आहेत. शिवाय २०२१ साली तर दोन कैदी कारागृहाची भिंती केबल वायरलच्या साहाय्याने ओलांडून पळून गेले होते. मात्र त्यांना काही दिवसांनी पकडून पुन्हा कारागृहात टाकले होते. त्यातच कैद्यांकडे मोबाईल सापडण्याचे प्रकार नेहमी घडत असल्याचे दिसून येत होते. त्यामध्ये काही कैदी हे आपल्या नातेवाईकांना मित्र आणि इतर कामाकरता लपूनछपून मोबाईलचा वापर कारागृहातून करत आहेत, असे आ़ढलले. विशेष म्हणजे कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात आधारवाडी कारागृहात मोबाईल आणि अन्य वस्तू सापडल्यावर अनेक गुन्हे स्थानिक पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले. मात्र या गुन्ह्यांच्या तपासाचे पुढे काय झाले हे जेल प्रशासनाकडून सांगितले जात नव्हेत.

कैद्यांकडे १५ मोबाईल सापडले - असाच एक प्रकार मे आणि जून महिन्यात समोर आला होता. त्यावेळी कारागृहात सर्च ऑपरेशनमध्ये कैद्यांकडे १५ मोबाईल सापडले हाेते. मोबाईल सापडल्यावर जेल प्रशासनाकडून जी ठोस कारवाई व्हायला हवी होती. ती करण्यात आली नव्हती. त्यामुळे या गंभीर प्रकरणात कारागृह विभागाकडून कल्याणचे कारागृह अधीक्षक अंकुश सदाफुले यांच्या विरोधात निलंबनाची कारवाई झाली आहे. आता त्यांच्या निलंबनानंतर पुढील चौकशी होणार आहे. तर दुसरीकडे कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर ठोसआणि उचित कारवाई न केल्याचा ठपका ठेवत सदाफुले यांच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे.

कारागृहात मोबाईल सापडल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र अधीक्षकांच्या विरोधात निलंबनाच्या कारवाईने जेल अधिकारी-कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या संदर्भात अंकुश सदाफुले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.