ठाणे किरकोळ वादातून शहापूर तालुक्यातील हिव गावात राहणाऱ्या एका गावकऱ्याची सहाच्या टोळीने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून दोघा हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. कैलास शेळके, काळुराम बसवंत, निखिल भांडे, योगेश चव्हाण, जयेश डुकरे पाचही आरोपी खुटघर गावातील रहिवाशी आहे. तर एक हिव गावातील अमोल धामणे अशी गुन्हे दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. तर दिलीप शंकर खूपसे वय ४५ असे हत्या झालेल्या गावकऱ्याचे नाव आहे.
हिव गावचे पोलिस पाटील समोरच निर्घृण हत्या पोलीस सूत्राने दिलेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील हिव गावात मृतक दिलीप खूपसे हे कुटूंबास राहत होतो. काही दिवसापूर्वी आरोपीकडे असलेल्या एमएच ०४ एओ ४२०५ या क्रमांकाच्या टेम्पो पिकअपची संशय बाळगून मृतक दिलीप यांनी आरोपीकडे चौकशी केली होती. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला होता. त्यातच खुटघर येथील राहणारे पाच मारेकरी काल मध्यरात्री दीड वाजल्याच्या सुमारास मृत दिलीप यांच्या घरी आले. आणि हिव गावचे पोलिस पाटील बळीराम मिरकुटे यांच्या समोरच मारेकऱ्यांनी अचानक धारदार शस्त्राने त्यांची निर्घृण हत्या केली. त्यानंतर दिलीप खुपसे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शहापूर उपजिल्हा रुग्णालयात आणले होते.
पोलीस अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर मृतदेह घेतला ताब्यात मात्र जो पर्यंत दिलीपचे मारेकऱ्यांना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने शहापूर पोलिसांनी हत्याचा गुन्हा दाखल करताच, तातडीने दोन आरोपींना अटक केली. तर अन्य आरोपींना पकडण्यासाठी पोलिस पथक रवाना केले आहे. असे आश्वासन उपविभागीय अधिकारी यांनी दिल्याने मृतदेह ताब्यात घेतले.
हत्येचे कारण अधिक चौकशी नंतर होईल स्पष्ट या घटनेचा तपास शहापूर उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहापूरचे पोलिस निरीक्षक राजकुमार उपासे यांनी तपास सुरू करत काही तासातच २ आरोपींना ताब्यात घेतले. अन्य ४ फरार आरोपींचा शोध सुरू केला असून हत्येचे कारण अधिक चौकशी नंतर तपशीलाने लवकरच स्पष्ट होईल, असे शहापूर पोलीसांनी सांगितले. तर इतर चारही आरोपी लवकरात गजाआड करणार असल्याचे शहापूरचे उपविभगिय पोलिस अधिकारी, नवनाथ ढवळे यांनी सांगितले.