ठाणे - बसच्या धडकेत एका महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावर धसई येथे रस्ता ओलांडताना हा अपघात झाला. यात एका महिला जागीच ठार झाली आहे.
हेही वाचा - मित्राने बायकोसोबत व्हिडिओ कॉलिंगचे स्क्रिनशॉट दाखवल्याने पत्नीचा गळा आवळून खून
वनिता कडव असे मृत महिलेचे नाव आहे. शहापूर-किन्हवली रस्त्यावरील धसई येथे कर्मा रेसिडेन्सी येथे त्या राहत होत्या. गुरूवारी सकाळच्या सुमाराला वनिता कडव या आपल्या कर्मा रेसिडेन्सी समोरील रस्ता ओलांडत असताना भरधाव वेगाने येणाऱ्या महामंडळाच्या बसने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी बस चालकावर किन्हवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले आहे.
हेही वाचा - मौजमजेसाठी महागड्या दुचाकी चोरणारे महाविद्यालयीन तरुण जेरबंद