ETV Bharat / state

Live : भिवंडी इमारत दुर्घटना : मृतांचा आकडा 20 वर.. मदत व बचावकार्य सुरूच

author img

By

Published : Sep 21, 2020, 6:27 AM IST

Updated : Sep 22, 2020, 10:00 AM IST

भिंवडीच्या पटेल कंपाऊंड परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. यात 20 जणांचा मृत्यू झाला आहे. भिवंडी इमारत दुर्घटना 55 वर्षीय महिलेला 12 तासा नंतर जिवंत बाहेर काढले

A three-storied building collapses in Patel Compound area in Bhiwandi, Thane
Live : भिंवडीत ३ मजली इमारत कोसळली; ५ बालकांसह १० जणांचा मृत्यू, गुन्हा दाखल

ठाणे - भिवंडीच्या धामणकर नाका, पटेल कंपाऊंड परिसरात असलेली एक ३ मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अनेक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफ आणि टीडीआरएफची टीम दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे. ही घटना सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास घडली. राज्य शासनाकडून मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. या घटनेबाबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले आहे.

LIVE UPDATE -

- मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार घटनास्थळाला भेट देणार

- आणखी दोघांचा मृतदेह सापडला, एकूण मृतांची संख्या 20 वर

- आणखी एकाचा मृतदेह सापडला असून, एकूण मृतांची संख्या 18 वर पोहोचल्याची माहिती ठाणे महापालिकेने दिली आहे.

- आणखी एका व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असून, एकूण मृतांची संख्या 17 वर पोहोचली आहे.

- आणखी एक तरुणी व एक तरुणाचा मृतदेह ढिगाऱ्या खालून बचाव पथकाने बाहेर काढल्याने मृतांची संख्या पोहोचली 16 वर, बचाव कार्यसह मदत कार्य सुरूच

- आणखी एक मृतदेह काढला, मृतांची संख्या 14 वर.

- बचाव पथकाने आणखी एक मृत्यदेह ढिगाऱ्याखालुन काढल्याने मृत्यूची संख्या 13 वर. मदत व बचावकार्य 48 तास चालणार असल्याची अग्निशमन दलाच्या जवानांची माहिती.

- मृतांचा आकडा 11 वर

ढिगाऱ्याखालून आणखी एक महिलेचा मृतदेह बाहेर काढल्याने मृतांची संख्या 11 वर पोहोचली आहे. तर जखमींची संख्या 20 वर पोहोचली आहे. दरम्यान मदत आणि बचाव पथकाचे कार्य 48 तासांपर्यंत चालणार असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली असून अजूनही पाऊस सुरू असल्याने मदत व बचाव कार्य पथकाला अडथळे येत आहेत.

- पावसामुळे बचावकार्यात अडथळे

या दुर्घटनेत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू 25 जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यातच आज दुपारच्या सुमाराला मदत कार्य घटनास्थळी सुरू असताना पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे बचावकार्यात अडथळे निर्माण होत असल्याचे पहावयास मिळाले आहेत.

- इंडिया बचाव पथकाने सुखरूप बाहेर काढलेल्या 55 वर्षीय महिलेला जखमी अवस्थेत उपचारासाठी ठाण्याच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- 55 वर्षीय महिलेला 12 तासानंतर जिवंत बाहेर काढले.

इमारत मालकावर गुन्हा दाखल -

भिवंडी इमारत दुर्घटनेप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात इमारतीचा मालक सय्यद अहमद जिलानी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम 337, 338, 304 (2) प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

रेस्क्यू ऑपरेशन करुन लहान बाळाला वाचवलं...

मुख्यमंत्री ठाकरेंनी व्यक्त केलं दु:ख -

भिवंडी येथील इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती संवेदना प्रकट केल्या आहेत. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी देखील मुख्यमंत्री ठाकरे बोलले असून बचावकार्य व्यवस्थित व काळजीपूर्वक पार पाडण्याचे तसेच जखमींवर योग्य उपचार करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

'ईटीव्ही भारत'ला मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीच्या पटेल कंपाउंड परिसरात असलेली 'जिलानी' नामक ३ मजली इमारत, सोमवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली आणि गोंधळ उडाला. यात १० जणांचा मृत्यू झाला. तर 100 हून अधिक नागरिक ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

इमारत कोसळल्यानंतरचे दृश्य...

घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफ आणि टीडीआरएफच्या टीम दाखल झाल्या आणि बचावकार्याला सुरूवात केली. पण घटनास्थळी जाण्यासाठी चिंचोळ्या गल्ल्या तसेच हा परिसर खूपच दाटीवाटीचा आहे. त्यामुळे बचावकार्यसाठी यंत्रसाम्रगी घेऊन जाण्यात बचाव कार्याच्या पथकाला अडचणीचे ठरत आहे. आतापर्यंत ढिगाऱ्या खालून बारा जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढले असून त्यांना आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ही इमारत सुमारे 30 वर्षे जुनी असून महानगरपालिकेने या इमारतीला एल टाइपमधील धोकादायक इमारत म्हणून घोषित केले आहे. या इमारतीत एकूण 54 सदनिका होत्या, यापैकी 21 सदनिका पत्ताच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. विशेष म्हणजे, महानगरपालिकेने फ्लॅटधारकांना दोन वेळा नोटीस बजावली आहे.

  • आतापर्यंत ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आलेल्यांची नावे -

१) मोबिन शेख ( वय ४५ )

२) हैदर सलमानी ( वय २० )

३) रुकसार कुरेशी ( वय २६ )

४) मोहम्मद अली ( वय ६० )

५) शब्बीर कुरेशी (वय ३० )

६) मोमीन शेख ( वय ४५ )

७) कैसर सिराज शेख ( वय २७ )

८) रुकसार जुबेर शेख ( वय २५ )

९) अबुसाद सरोजुद्दीन अन्सारी ( वय १८ )

१०) आवेश सरोजुद्दीन अन्सारी (वय २२ )

११) जुलेखा अली शेख ( वय ५२ )

१२) उमेद जुबेर कुरेशी (वय ४ )

  • दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे -

१) जुबेर कुरेशी (वय ३०)

२) फायजा कुरेशी (वय ५)

३) आयेशा कुरेशी (वय ७)

४) बब्बू (वय २७)

५) फातमा जुबेर बबु (वय २)

६) फातमा जुबेर कुरेशी (वय ८)

७) उजेब जुबेर (वय ६)

८) असका आबिद अन्सारी (वय १४)

९) अन्सारी दानिश अलिद (वय १२)

१०) सिराज अहमद शेख (वय २८)

Last Updated : Sep 22, 2020, 10:00 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.