नवी मुंबई - महाराष्ट्रात दिवसागणिक कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. बेड आणि ऑक्सिजनच्या कमतरतेचा सामना रुग्णालय आणि कोविड सेंटरना करावा लागत आहे. त्यामुळे, आता ऑक्सिजनची कमतरता पूर्ण करण्यासाठी भारतीय रेल्वेने पुढाकार घेतला आहे. विशाखापट्टणम येथून ऑक्सिजन आणण्याकरिता पनवेलमधील कळंबोली येथून विशेष ऑक्सिजन एक्स्प्रेस रवाना करण्यासाठीची तयारी भारतीय रेल्वेने पूर्ण केली आहे.
हेही वाचा - राष्ट्रवादीच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचे निधन
राज्यात भासत आहे ऑक्सिजनची कमी
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या दुपटीने वाढत आहे. अनेक कोरोनाबाधितांना ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे. परंतु, ऑक्सिजनच्या पुरवठ्यापेक्षा मागणी वाढल्याने अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता भासत आहे.
कळंबोली येथे विशेष ट्रॅक
विशाखा पट्टणम येथे रेल्वेमार्फत राज्य सरकारकडून पुरवण्यात आलेले टँकर नेण्यासाठी कळंबोली रेल्वे स्थानकावर सलग 48 तास काम सुरू ठेऊन प्लॅटफॉर्मची निर्मिती करण्यात आली आहे. या ठिकाणी 16 टन क्षमतेचे 10 टँकर विशेष ट्रेनवर चढवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - 'चेन्नई एक्सप्रेस'मधून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविणारा आरोपी अटकेत