ETV Bharat / state

मांत्रिक बाबाचा सल्ला आणि तिघांची गळफास घेऊन आत्महत्या, हे होते कारण...

शहापूर तालुक्यातील चांदा गावातील मामा-भाचे व एका मांत्रिक बाबाने झाडाला गळफास घेत आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश प्राप्त झाले असून अमर होण्यासाठी त्यांनी ही आत्महत्या केल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

सचिन कनकोसे
सचिन कनकोसे
author img

By

Published : Nov 26, 2020, 2:01 AM IST

Updated : Nov 26, 2020, 1:32 PM IST

ठाणे - शहापूर तालुक्यातील चांदा गावातील मामा-भाचे, शहापूर येथील एका मांत्रिक बाबा व एक तरुण मोक्ष प्राप्तीसाठी आत्महत्या करण्याचा डाव रचला होता. त्याचवेळी एका तरुणाला मोबाईलवर वडिलांनी फोन केल्याने तो घटनास्थळावरून पसारा झाला होता. मात्र, 10 दिवसांनी तो पोलिसांच्या तावडीत सापडला. त्यांनतर माहिती लपविल्याप्रकरणी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता धक्कादायक सत्य समोर आले आहे. सचिन कनकोसे, असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. तर मुकेश घावट, महेंद्र दुभेले, असे अमर होण्यासाठी आत्महत्या करणाऱ्या मामा-भाच्याची नावे आहेत. तर या तिघांना तंत्रमंत्र विद्याने मोक्ष प्राप्त होईल, असे आमिष दाखवून आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणारा मृत तांत्रिक बाबा नितीन भेरे याच्यावरही आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मामा-भाचे
मामा-भाचे

मंत्र-तंत्रची विद्या अयशस्वी ठरली अन...

मृत मांत्रिक बाबा नितीन भेरे याने तंत्र-मंत्रची विद्या शिकण्यासाठी 14 नोव्हेंबरला रात्री एका निरव शांतता असलेल्या ठिकाणी जाण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी चांदा येथील ठिकाण निश्चित करण्यात आले. त्या रात्री मांत्रीक बाबा नितीन भेरे यांनी मुकेश घावट, महेंद्र दुभेले, सचिन कनकोसे यांना सोबत घेत जंगलाची वाट धरली व इच्छित स्थळी पोहोचले. यानंतर सर्व उलट झाले. जणू मंत्र, तंत्राची विद्या अयशस्वी ठरली आणि भेरे महाराजाचा भ्रमनिराश झाला. त्यामुळे तांत्रिक बाबा नितीन भेरे याने अमर होण्यासाठी आत्महत्या करण्यासाठी तिघांना प्रवृत्त केले. त्यानुसार 4 फास तयार करण्यात आले. नितीन भेरे यांनी आणलेल्या साडीचा फास तयार करून झाडावर चढून फास घेण्यासाठी सुरुवात झाली.

तांत्रिक बाबा
तांत्रिक बाबा

साडीपासून ते तिघांच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सच्या तपासामुळे पोलिसांना यश

आत्महत्या करताना सचिन कनकोसेला मोबाईलवर वडिलांनी फोन केल्याने तो घटनास्थळावरून पसारा झाला होता. मात्र, तोपर्यंत मांत्रिक बाबासह मामा-भाच्याने झाडाला साडी बांधून गळफास घेतला होता. सात दिवसांनी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्या तिघांचे मृतदेह आढळले होते. ही हत्या की आत्महत्या याबाबत शहापूर तालुक्यात विविध चर्चांना उधाण आले असल्याने या दुर्दैवी घटनेबाबत शहापूर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवून गळफास लावण्यासाठी वापरलेल्या साडीपासून ते तिघांच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्सपर्यंत अतिशय गोपनीय पद्दतीने तपास सुरू ठेवून तपासाअंती घटनास्थळाहून पळालेला तरुण पोलिसांच्या तावडीत सापडला आणि हा धक्कादायक प्रकार समोर आला.

सचिनला घरुन फोन आला आणि तो ...

आत्महत्येची तयारी सुरू असतानाच बचावलेल्या सचिन कनकोसेला मोबाईलवर घरुन फोन येण्यास सुरुवात झाली. पहिले 4 ते 5 वेळा सचिनने फोन उचलले नाही. मात्र, नंतरचा फोन त्याने उचलला. फोनवर संभाषण सुरू असतानाच सचिनने झाडावरून उडी घेतली व घटनास्थळाहून पळ काढला. तो थेट कुंडन (शिरोळ) येथील घरी पोहोचला. तोपर्यंत तीघांनी फास घेतला होता. मला फोन आला म्हणून मी वाचलो अशी कबुली पोलिसांसमोर त्याने दिली.

अटक सचिनला दोन दिवसांची पोलीस कोठडी

या प्रकरणी शहापूर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या मृत बाबा नितीन भेरे व त्यांना मदत करून पोलिसांपासून माहिती लपविल्या प्रकरणी भा.दं.वि.चे कलम 306 व 202 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर मृताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनुसार सचिन कनकोसे याला अटक करून त्याच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार तीघांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी सचिन कनकोसे याला अटक करून बुधवारी (दि. 25 नोव्हेंबर) न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्या आली आहे. अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी, नवनाथ ढवळे करीत आहेत.

हेही वाचा - मनसेच्या वीजबील कपात आंदोलनाला पोलिसांची खीळ; जिल्हाबंदीनंतरही मनसे ठाम

Last Updated : Nov 26, 2020, 1:32 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.