ठाणे : बजाज फायनॅन्समधुन लोन पास झाल्याचे मारायचे थाप : तक्रारदार अनिल कारभारी आव्हाड हे डोंबिवली मानपाडा भागात राहणारे असून नोव्हेंबर महिन्यात त्यांनी एका इमारतीमध्ये नवीन घर घेण्याचे प्रयत्न करत होते. त्यासाठी त्यांनी घर खरेदीसाठी लोन मिळावे म्हणून विविध बँकांमध्ये प्रयत्न करीत होते. त्यातच त्यांना २२ नोव्हेंबर रोजी मोबाईलवर आर. के. शर्मा नावाच्या व्यक्तीने संर्पक करून त्याने सांगितले की, मी बजाज फायनॅन्समधुन बोलत असुन, तुमच्या नावावर १० लाखाचे लोन पास झाल्याची थाप मारली. त्यानंतर आव्हाड यांना बजाज फायनॅन्सच्या नावाने १० लाख रुपयाचे लोन मंजुर झाल्याचे मोबाईलवर कॉल व मॅसेज वारंवार येवु लागले. तसेच लोन पाहिजे असल्यास शषांक प्रसाद यांचे नावे कोटक महिंद्रा, दिल्ली या बँकेचे अकाऊंटवर प्रथम ३० हजार रुपये प्रोसेसिंग फी भरावी लागेल असे सांगण्यात आले. त्याप्रमाणे आव्हाड यांनी लोन मंजुरीसाठी ३० हजार शषांक प्रसाद यांचे बँक अकाऊंटवर ऑनलाईन पाठविले. (bank loan processing fees)
'अशी' भीती नागरिकांना दाखवून फसवणूक : त्यानंतरही आरोपींनी आव्हाड यांना वारंवार प्रोसेसिंग फी साठी आणखी रक्कम लागेल तसेच तुमचे लोन २७ लाख रुपये मंजुर झाले आहे. त्यासाठी आणखी रक्कम भरणा करावी लागेल असे सांगितल्याने, आव्हाड यांनी ठगांच्या बोलण्यावर विश्वास ठेवुन वारंवार वेगवेगळया खात्यावर ऑनलाईन पैसे पाठवण्यास भाग पाडुन, तसेच तुम्ही जर पैसे भरले नाही, तर तुमचे यापुर्वी भरलेले पैसे बुडतील, अशी भीती दाखवून त्यांच्याकडून एकुण ७ लाख ३४ हजार ५०० रुपये विविध बँक अकाऊंटवर भरणा करण्यास भाग पाडले होते. (gang of thugs in Delhi)
दिल्लीच्या अज्ञात ठगा विरोधात गुन्हा दाखल : ७ लाखांच्यावर रक्कम देऊन झाल्यानंतर आव्हाड यांनी लोनचे संबधात ठगांशी बोलणे केले असता, ठगांनी आणखी एक लाख रुपये भरणा करण्यास आव्हाड यांना सांगितले. यावरुन आव्हाड यांना ऑललाईन ठग आपली फसवणूक करत असल्याचा संशय आल्याने त्यांनी ५ डिसेंबर रोजी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेऊन दिल्लीच्या अज्ञात ठगा विरोधात भादवि कलम ४२०, ३४ सह आय. टी. अॅक्ट ६६ (ड) प्रमाणे गुन्हा दाखल केला. (Gang of thugs arrested)
बँक अकाऊंटवरून आरोपींचा लागला छडा : तक्रारदार आव्हाड यांनी दिलेल्या माहितीचे आधारे वपोनिरी. . शेखर बागडे यांनी तातडीने गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन आव्हाड यांनी ज्या बँकांमध्ये पैसे भरणा केले आहेत, त्या बँकांची माहिती प्राप्त करुन सदरचे बँक अकाऊंट लागलीच सिल करणेबाबत संबधित बँकांशी पत्रव्यवहार केला. त्यावरुन सदरचे बँक अकाऊंट सिल करण्यात आले. सदर बँक अकाऊंटवर असलेल्या पत्यांची खात्री करण्यासाठी मानपाडा गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार यांना आरोपींच्या शोधात नवी दिल्ली येथे रवाना केले.
तिन्ही आरोपीना विविध ठिकाणाहून अटक : सदर बँक अकाऊंटचे पत्यांवर आरोपीचा दिल्लीत पोलीस पथकाने शोध घेतला असता, आरोपी नमन संजय गुप्ता हा अमृतसर येथे असल्याचे समजल्याने त्याचा अमृतसर येथे शोध घेतला, मात्र त्यावेळी तो शिमला येथे गेल्याचे पोलीस तपासात आढळुन आल्याने पोलीस पथक, हिमाचल प्रदेश मधील शिमला येथे जावुन त्याचा शोध घेतला. तो शिमला येथे एका लॉजमध्ये असल्याचे समजताच, पोलीस पथकाने त्या लॉजवर सापळा रचुन त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीकडे केलेल्या चौकशीत त्याचे साथीदार हे नोएडा, उत्तरप्रदेश व दिल्ली येथे राहत असल्याचे समजल्याने, त्याने दिलेल्या माहितीवरुन आकाशकुमार सुनिल चांदवानी यास दिल्ली येथून व आरोपी रिशी दिपककुमार सिंग पास नोएडा, उत्तरप्रदेश येथून ताब्यात घेण्यात आले आहे.
आरोपी 'असे' करायचे नागरिकांची ऑललाईन फसवणूक : तिन्ही अटक ठगांची अधिक चौकशी केला असता त्यांनी बनावट कागदपत्रांचे आधारे विविध बँकांमध्ये अकाऊंट उघडुन, उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड, पुणे येथे राहणाऱ्या नागरीकांना बजाज फायनॅन्सचे लोन मंजुर झाल्याचे फोन करुन सांगायचे. प्रोसेस फीच्या नावाने १ लाख रुपये बनावट अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगुन, सदरचे पैसे अकाऊंटमध्ये आल्यावर लोनधारकांना सिव्हील चांगले असल्याची बतावणी करून तुमचे अधिक लोन मंजुर होवू शकते असे सांगुन त्यांना प्रोसेस फी वाढवून आणखी रक्कम बनावट बँक अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करण्यास सांगायचे. सदरचे पैसे ऑनलाईन प्राप्त झाल्यावर लोनधारकाला आणखी प्रोसेसे फी भरावी लागेल, नाही तर यापुर्वी भरलेले पैसे बुडतील असे मॅसेज करून त्यांच्याकडून आणखी रक्कम प्राप्त करुन घेवुन नागरीकांची फसवणुक करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
९ लाख २१हजारांचा मुद्देमाल हस्तगत : तिन्ही अटक आरोपी कडून ७ लाख ३४ हजार ५०० तसेच ०५ मोबाईल फोन, एटीएम कार्ड असा एकुण ९, लाख २१,हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. दिल्लीच्या ठगांचा तांत्रिक व शिताफीने शोध घेण्यासाठी पोलीस उप आयुक्त, सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे, यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनिरी. शेखर बागडे, पोनिरी. (प्रशा) सुरेश मदने, सपोनिरी. अविनाश वनवे, सपोनि सुनिल तारमळे, पोहवा. सुशांत तांबे, रोहवा सुनिल पवार, पोना भिमराव शेळके, प्रविण किनरे, पोशि. बालाजी गरुड, संतोष वायकर या पोलीस पथकाने केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनिल कुराडे यांनी दिली आहे.