ETV Bharat / state

कोरोना खबरदारी : मला बोर होतंय... पण मी घराबाहेर जात नाही, तुम्हीही जाऊ नका ना..

author img

By

Published : Mar 27, 2020, 3:00 PM IST

सध्या कोरोनाला आळा घालण्यासाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. त्यासाठी संचारबंदीही लागू केली आहे. मात्र, नागरिक न ऐकता रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यासाठी ठाण्यातील एका चिमुकलीने सर्वांना भावनिक आवाहन केले आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र
प्रतिकात्मक छायाचित्र

ठाणे - 'मी आठ दिवस खेळले नाही... बाहेर गेले नाही... मला खूप बोर झालंय. पण बाहेर करोना आहे. त्यामुळे तुम्ही ही बाहेर जाऊ नका', हे शब्द आहेत ठाण्यातील ५ वर्षाच्या चिमुकलीचे. तिने सर्वांना घरी राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

'मला खूप बोर होतंय...पण मी घराबाहेर पडत नाही, तुम्हीही जाऊ नका ना'

अन्नदा डामरे, असे या चिमुकलीचे नाव असून ती श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटेबल ट्रस्ट या इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकते. सध्या कोरोनाला आळा घालण्यासाठी घराबाहेर न पडण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत. त्यासाठी संचारबंदीही लागू केली आहे. मात्र, नागरिक न ऐकता रस्त्यावर फिरताना दिसत आहे. त्यामुळे या चिमुकलीने सर्वांना घरी राहण्याचा संदेश दिला आहे. आमच्या लहानश्या मुलीला घराबाहेर जाऊ नये हे कळतंय. तर मोठ्यांना हे कळायलाचं पाहिजे. तिने दिलेला संदेश खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वांनी तो गंभीरपणे पाळावा, असे तिचे आई-बाबा म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.