ठाणे : विविध हतखंडे वापरून चालबाजीने १००हुन अधिक गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या गुन्हेगाराला पोलिसांनी अटक केली. त्याला सराईत गुन्हेगारांची वस्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबिवली रेल्वे स्थानकालगत असलेल्या इराणी वस्तीतून सापळा लावून खडकपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. या शंभर नंबरी गुन्हेगाराला पकडण्याचे खडतर काम करणाऱ्या पोलिसाच्या कामगिरीचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडून कौतुक होत आहे. हैदर तहजीब इराणी (वय,५२) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
अखेर 'त्या' अट्टल गुन्हेगाराला अटक; १०० हून अधिक गुन्ह्यांची आहे नोंद - thane latest crime news
अटकेत असलेला हैदर हा इराणी वस्तीतील गुन्हेगारांचा नेता असून त्याचे अनुकरण या वस्तीत केले जात होते. हैदर मोबाईल आणि चेन स्नैचिंग तसेच तोतया पोलीस अधिकारी बनून नागरिकांची लूटमार करण्यात पटाईत आहे.