ETV Bharat / state

खेळण्याच्या बहाण्याने नेवून ९० हजारात विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत

भिवंडीत सहा महिन्यांच्या बाळाला शेजाऱ्यांना ९० हजार रुपयांना विकल्याची घटना घडली. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी फरीदा अन्सारी या महिलेला अटक केली.

विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
author img

By

Published : Dec 24, 2019, 9:57 PM IST

ठाणे - बोलता न येणाऱ्या दांपत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला ९० हजार रुपयांना विकल्याचे समोर आले. मात्र, पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे बाळाची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी फरीदा अन्सारी(वय - ४०) आणि तिचा मुलगा तौफिक(वय - १७) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी फरीदाला अटक केली असून मुलगा तौफिक फरार झाला आहे.

विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत
विक्री केलेले बाळ पुन्हा आईच्या कुशीत

अरमान इस्तियाक अन्सारी(वय - ६ महिने) असे अपहरण होऊन सुटका झालेल्या बाळाचे नाव आहे. अस्मा अन्सारी (वय-३०) आणि इस्तियाक अन्सारी (वय -३५) हे दाम्पत्य भिवंडीतील फातमानगरमध्ये राहते. दोघांनाही बोलता येत नाही. याचा फायदा शेजारी राहणाऱ्या फरीदा आणि तिचा मुलगा तौफिक यांनी घेतला. बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने घरातून घेऊन गेले.

हेही वाचा - कल्याण-डोंबिवली लोकल वाहतूक ऐन ख्रिसमस दिवशी राहणार बंद, काही गाड्या रद्द

दरम्यान त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथे राहणाऱ्या एका दाम्पत्याला या बाळाचे आई-वडील खूपच गरीब आहेत, असे सांगितले. त्यांना हे बाळ दत्तक घेण्याची विनंतीही केला. त्यांनीही आरोपी महिलेवर विश्वास ठेवून त्या बाळाला ९० हजार रुपयात घेण्याची तयारी दर्शवली. २२ डिसेंबरला या बाळाची विक्री करण्यात आली.

दरम्यान, आई-वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाण्यात शेजाऱ्यांनी बाळाचे अपहरण केल्याची तक्रार दिली. या गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक (गुन्हे) नितीन पाटील यांनी वेगाने तपासाची सूत्रे हलवली. अपहरणकर्ती फरीदा अन्सारीला ताब्यात घेऊन चौकशी केली. आरोपीने आपला गुन्हा कबुल केला.

यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या पथकाने कासरवडली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मदतीने घोडबंदर रोडवरील डोंगरीपाडा येथून बाळाची सुखरूप सुटका केली. अटकेत केलेल्या आरोपी महिलेला न्यायालयात हजर केले असता २६ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तिच्या फरार मुलाचा पोलीस शोध घेत आहेत.

Intro:kit 319Body:खेळण्याच्या बहाण्याने नेवून ९० हजारात विक्री केलेले 'बाळ' पुन्हा आईच्या कुशीत

ठाणे : मुक्या दांपत्याच्या सहा महिन्यांच्या बाळाला खेळण्याच्या बहाण्याने नेवून त्याची ९० हजार रुपयाला दत्तक देण्याच्या बहाण्याने विक्री केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शेजारी राहणाऱ्या फरीदा अंसारी ( ४० ) व तिचा मुलगा तौफिक ( १७ ) या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत पोलिसांनी फरीदाला अटक केली आहे. तर मुलगा तौफिक फरार झाला आहे.
तर अरमान इस्तियाक अंसारी ( ६ महिने ) असे अपहरण होऊन सुखरूप सुटका झालेल्या बाळाचे नांव आहे. विशेष म्हणजे घटनेची गांभीर्य ओळखून शांतीनगर पोलिसांनी जलद गतीने तपास करीत त्या बाळाचा शोध घेऊन आईच्या स्वाधीन केले. त्यावेळी आईने बाळाला पुन्हा कुशीत घेताच तिचे डोळे पाणावल्याचे पाहून पोलिसही भावुक झाले होते.

भिवंडीतील फातमानगरमध्ये बाळाची आई अस्मा ( ३० ) आणि वडिल इस्तियाक (३५ ) हे राहत असून ते दोघेही मुके आहेत. त्याचा फायदा घेत शेजारी राहणारी आरोपी फरीदा व तिचा मुलगा तौफिक यांनी बाळाला खेळवण्याच्या बहाण्याने सुरुवातीला ५ डिसेंबर रोजी घरातून नेवून त्याला ६ डिसेंबर रोजी घरी आणले. त्यानंतर पुन्हा ६ डिसेंबर रोजी सायंकाळी त्याला घरातून नेवून १६ डिसेंबर रोजी घरी आणले. या दरम्यान त्यांनी ठाण्यातील घोडबंदर रोड वरील डोंगरीपाडा येथे राहणाऱ्या एका दांपत्याला या बाळाचे आई वडील खूपच गरीब आहे. त्यामुळे त्यांना हे बाळ दत्तक देण्याचा बहाणा केला. यामुळे दांपत्यांनी आरोपी महिलेवर विश्वास ठेवून त्या बाळाचा ९० हजार रुपयांत सौदा केला होता. सौदा पक्का झाल्याने त्या बाळा पुन्हा १६ डिसेंबर रोजी नेवून २१ डिसेंबरला त्याला आणले होते. मात्र पुन्हा त्यास २२ डिसेंबर रोजी दुपारी खेळण्याच्या बहाण्याने घरातून नेवून त्याची त्या दांपत्यांना ९० हजारात विक्री केली.
दरम्यान, बाळाचे अपहरण झाल्याने आई-वडिलांनी शांतीनगर पोलीस ठाणे गाठून शेजारी राहणारी फरीदा व तिचा मुलगा तौफिक या दोघांच्या विरोधात भादंवि.कलम ३६३ ,३४ अन्वये गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक (गुन्हे ) नितीन पाटील यांनी संशयीत अपहरणकर्ती फरीदा अंसारी हिला त्याच रात्री ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला.
त्यांनतर शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नितीन पाटील, पोहा. अनिल भिवर, पोना. प्रशांत राणे, सचिन वेताळ, संजय चव्हाण, श्रीकांत पाटील या पोलीस पथकाने कासरवडली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश काळदाते यांच्या मदतीने घोडबंदर रोड वरील डोंगरीपाडा येथे राहणाऱ्या त्या दांपत्याच्या घरातून बाळाची सुखरूप सुटका केली. अटकेत असलेल्या आरोपी महिलेला आज न्यायालयात हजर केले असता २६ डिंसेबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. तर तिच्या फरार मुलाचा पोलीस शोध घेत आहे.

Conclusion:boy
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.