मीरा भाईंदर : केस बारीक केले म्हणून १३ वर्षीय मुलान आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना भाईंदरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भाईंदर पूर्वेतील न्यू गोल्डन एरियामध्ये सोनम इंद्रप्रस्थ नावाची इमारत आहे. या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर पाठक कुटुंबीय राहतात. त्यांचा १३ वर्षांचा मुलगा शत्रुघ्न राजीव पाठक आठवीच्या वर्गात शिकतो. शत्रुघ्नचा चुलत भाऊ त्याला केस कापायला घेऊन गेला. मात्र, त्याचे केस पातळ कापण्यात आल्याने तो नाराज होता. नाराज झालेल्या शत्रुघ्नने घरी येताच टोकाचे पाऊल उचलले.
घटना नेमकी काय ? भाईंदरच्या न्यू गोल्डन एरियामध्ये सोनम इंद्रप्रस्थ नावाची इमारत आहे. हा मुलगा त्याच इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर कुटुंबासह राहत होता. मुलगा 13 वर्षांचा असून तो आठवीत शिकतो. घटनेच्या दिवशी त्याचा चुलत भाऊ त्याला केस कापण्यासाठी सलूनमध्ये घेऊन गेले होते. पण सलूनच्या मालकाने त्याचे केस अगदी बारीक कापले. यामुळे मुलगा चांगलाच संतापला. कुटुंबीयांनी त्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे केस बारीक कापले गेल्याचा त्याला राग आला होता.
आत्महत्येमुळे परिसरात शोककळा : भाईंदर पूर्वेला न्यू गोल्डन परिसरात सोनम इंद्रप्रस्थ इमारतीच्या १६ मजल्यावर पाठक कुटुंब राहते. कुटुंबातील इयत्ता ८ वीत शिकणारा शत्रुघ्न राजीव पाठक ह्या १३ वर्षांच्या मुलास त्याच्या सख्ख्या चुलत भावाने केस कापण्यास नेले होते. परंतु केस बारीक कापल्याने तो रागावला. त्यानंतर घरातील सदस्यांनी खूप समजूत घातली मात्र, त्यांना अपयश आले. मंगळवारी रात्री साडे अकराच्या सुमारास शत्रुघ्नने आत्महत्या केली. शत्रुघ्न हा पाठक यांचा सर्वात लहान मुलगा होता. त्याला दोन मोठया बहिणी आहेत. सर्वात लहान असल्याने तो सर्वांचा लाडका होता. त्याच्या या आत्महत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
अकस्मात मृत्यूची नोंद : घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी नवघर पोलीस दाखल झाले. शव ताब्यात घेऊन पंचनामा करून पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे करत आहेत.