ETV Bharat / state

कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीसाठी ८५ टक्के मतदान; मतपत्रिका जळल्याने खळबळ - मतपत्रिका

उमेदवारांनी फेरमतदान घेण्याची मागणी केल्याने निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

जळालेल्या मतपत्रिका
author img

By

Published : Mar 18, 2019, 3:07 AM IST

ठाणे - कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी रविवारी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत ८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील शेतकरी मतदार संघातल्या गण क्रमांक १२ ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथ वरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकाना आग लागल्याची घटना घडली. यामध्येकाही मतपत्रिका जळाल्याने अधिकाऱ्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, उमेदवारांनी फेरमतदान घेण्याची मागणी केल्याने निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

संबंधित व्हिडीओ

नव्या शासन नियमानुसार केवळ शेतकऱ्यानांच बाजार समितीचा सभासद करण्यात येत आहे. त्यामध्ये १८ हजार ५३० मतदार समिती सदस्यांची निवड करणार आहेत. १८ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून यावर शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण, निळजे, नांदिवली तर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोवेली, खडवली, टिटवाळा, बावेघर १२ गणामध्ये २९ ठिकाणी मतदान केंद्र असून १८ हजार ५३० मतदार बाजार समिती सदस्याची निवड करणारा आहेत. या १२ गणांमध्ये आज १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी मतमोजणी आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यत ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. २९ पैकी एक मतदान केंद्र बाजारसमितीच्या आवारात उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाच वाजता मतपेटी सील करण्यात आली. सील केलेली मतपेटी स्ट्रोगरूममध्ये नेत असताना या पेटीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने या मतपेटीचे सील उघडून पाहणी केली असता मतपेटीतील मतपत्रिका जळत असल्याचे लक्षात आले. तातडीने हि आग विझविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली. त्यांनंतर असून आरोप प्रत्यारोपणा उधान आले.

दरम्यान, कृषी उत्पन्न समितिचे माजी सभापती वंडार पाटील यांनी सकाळपासून सुरळीत पार पडलेल्या या निवडणुकीत आपला उमेदवार वरचढ वाटत असल्याने विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप करत फेर निवडणूकीची मागणी केली आहे. तर भाजप समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी आग लागल्याचा प्रकार म्हणजे निवडणुकीला लागलेला कलंक आहे. आमच्या उमेदवाराला 70 टक्के मतदान झाले आहे. आम्हाला पराभवाची चिंता नाही, मतपेटी सील करताना उमेदवारांना त्या ठिकाणी सोडले नाही. निवडणूक व पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकारी या घटनेला कारणीभूत असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

याप्रकरणी निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांनी याबाबतचा सविस्तर अहवाल निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकार्यांना पाठवला आहे. याप्रकरणाचा अहवाल तपासून याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे सांगितले.

Intro:Body:

ठाणे -  कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाच्या १८  जागांसाठी रविवारी निवडणुक पार पडली. या निवडणुकीत ८५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यातील शेतकरी मतदार संघातल्या गण क्रमांक १२ ची कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात असलेल्या बूथ वरील मतपेटी सील केल्यानंतर मतपेटीतील मतपत्रिकाना आग लागल्याची घटना घडली. यामध्ये काही मतपत्रिका जळाल्याने अधिकाऱ्यांनी सावरा सावर करण्याचा प्रयत्न केला. मात्र,  उमेदवारांनी फेरमतदान घेण्याची मागणी केल्याने निवडणूक वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे.

नव्या  शासन नियमानुसार केवळ शेतकऱ्यानांच बाजार समितीचा सभासद करण्यात येत आहे. त्यामध्ये 18 हजार 530 मतदार समिती सदस्यांची निवड करणार आहेत. १८ पैकी २ जागा बिनविरोध झाल्या असून यावर शिवसेनेचा एक आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आला आहे. मांडा, बल्याणी, बारावे, कल्याण, निळजे, नांदिवली तर्फे पाचनंद, फळेगाव, कुंदे, गोवेली, खडवली, टिटवाळा, बावेघर १२  गणामध्ये २९  ठिकाणी मतदान केंद्र असून   १८  हजार ५३०  मतदार बाजार समिती सदस्याची निवड करणारा आहेत. या १२ गणांमध्ये आज १६ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. तर सोमवारी मतमोजणी आहे. संध्याकाळी ५ वाजेपर्यत ८५ टक्के मतदानाची नोंद झाली. २९ पैकी एक मतदान केंद्र बाजारसमितीच्या आवारात उभारण्यात आले होते. या मतदान केंद्रावर संध्याकाळी साडेपाच  वाजता मतपेटी सील करण्यात आली. सील केलेली मतपेटी स्ट्रोगरूममध्ये नेत असताना या पेटीतून धूर येत असल्याचे निदर्शनास आल्याने तातडीने या मतपेटीचे सील उघडून पाहणी केली असता मतपेटीतील मतपत्रिका जळत असल्याचे लक्षात आले. तातडीने हि आग विझविण्यात आली. घटनेची माहिती मिळताच सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी बाजार समितीच्या आवारात गर्दी केली. त्यांनंतर असून आरोप प्रत्यारोपणा उधान आले.

दरम्यान, कृषी उत्पन्न  समितिचे माजी सभापती वंडार पाटील यांनी  सकाळपासून सुरळीत पार पडलेल्या या निवडणुकीत आपला उमेदवार वरचढ वाटत असल्याने विरोधकांनी हे कृत्य केल्याचा आरोप करत फेर निवडणूकीची मागणी केली आहे. तर भाजप समर्थक आमदार गणपत गायकवाड यांनी आग लागल्याचा प्रकार म्हणजे निवडणुकीला लागलेला कलंक आहे. आमच्या उमेदवाराला 70 टक्के मतदान झाले आहे. आम्हाला पराभवाची चिंता नाही, मतपेटी सील करताना उमेदवारांना त्या ठिकाणी सोडले नाही. निवडणूक व पोलीस अधिकाऱ्यांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. त्यामुळे निवडणूक अधिकारी व पोलीस अधिकारी या घटनेला कारणीभूत असून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.

याप्रकरणी निवडणूक अधिकारी शहाजी पाटील यांनी याबाबतचा  सविस्तर अहवाल निवडणूक अधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणजेच जिल्हाधिकार्यांना पाठवला आहे. याप्रकरणाचा अहवाल तपासून याप्रकरणी तातडीने निर्णय घेण्याचे आश्वासन जिल्हाधिकार्यांनी दिल्याचे सांगितले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.