ETV Bharat / state

नवी मुंबईत कोरोनाचा कहर सुरूच; एकाच दिवसात आढळले ७७ नवीन रूग्ण - नवी मुंबई कोरोना रुग्ण

अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. मंगळवारी नवी मुंबईत 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत हा आकडा सर्वाधिक आहे.

Corona positive
कोरोना पॉझिटिव्ह
author img

By

Published : May 13, 2020, 7:25 AM IST

नवी मुंबई - उपनगरात कोरोनाचा कहर वाढत असून, दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढतचं आहे. मंगळवारी नवी मुंबईत 77 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. आत्तापर्यंत सापडलेल्या कोरोनाबाधित रुग्णसंख्येत हा आकडा सर्वाधिक आहे.

अत्यावश्यक सेवेत आणि एपीएमसी मार्केटमध्ये कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना व त्यांच्या निकटवर्तीयांना कोरोनाची बाधा होत असल्याचे चित्र नवी मुंबईत आहे. यामुळे पालिका प्रशसनाची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत 867 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून त्यापैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी आहेत. 7 हजार 157 लोकांची कोरोना चाचणी करण्यात आली असून यातील 4 हजार 857 अहवाल निगेटीव्ह आले आहेत. 1 हजार 444 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबीत आहे.

माहिती देताना आयुक्त अण्णासाहेब मिसाळ

सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या 856 इतकी आहे. मंगळवारी 77 जण कोरोना पॉझिटिव्ह आले असून तुर्भे 29, कोपरखैरणे 18, नेरुळ 14, वाशी 4, घणसोली 1, ऐरोली 6, बेलापूर 5 या ठिकाणी रुग्ण सापडले.

आत्तापर्यंत शहरात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू झाला असून, 171 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता नवी मुंबईत ठिकाणं 91 प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत. नवी मुंबईतील रूग्णांचा महाराष्ट्रातील इतर ठिकाणांपेक्षा मृत्यूदर हा अंत्यत कमी असल्याचे आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.