ETV Bharat / state

Mumbai Crime : पायावर पाय दिल्याच्या वादातून ६५ वर्षीय वयोवृद्धाला मारहाण, जागीच मृत्यू - रेल्वे प्रवासात दोन प्रवाशांचे भांडण

ठाण्यात रेल्वे प्रवासादरम्यान दोन प्रावाशांमध्ये वाद झाला. त्याचे रूपांतर भांडणात झाले. यात एका वृद्धाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तो 65 वर्षीय वृद्ध होता. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.

Mumbai Crime
डोके आदळल्यामुळे 65 वृद्धाचा मृत्यू
author img

By

Published : Mar 3, 2023, 12:46 PM IST

Updated : Mar 3, 2023, 4:02 PM IST

ठाणे : धावत्या लोकलमध्ये वडिलांच्या पायावर पाय दिल्याच्या वादातून एका ६५ वर्षीय वयोवृद्धाची लोकलच्या लगेज डब्यात मारहाण करण्यात आली. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना कल्याण ते टिटवाळा रेल्वे स्थानका दरम्यान धावणाऱ्या लोकलमध्ये घडली आहे. याप्रकरणी कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. सुनिल यादव (वय 50, रा, वाशिंद ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. तर बबन हांडे देशमुख (वय,65) असे हत्या झालेल्या वयोवृद्ध प्रवासाचे नाव आहे.

रेल्वे प्रवासात दोन प्रवाशांचे भांडण : मृतक बबन हे आंबवली रेल्वे स्थानकानजीक असलेल्या अटाळी गावात कुटूंबासह राहत होते. त्यातच गुरुवारी सकाळच्या सुमारास मृत बबन हे कल्याण पश्चिम मधील रेशनींग कार्यलयात शिधा पत्रिकेतील नाव कमी करण्यासाठी आले होते. त्यानंतर काम आटपून ते पुन्हा कल्याण रेल्वे स्थानकात येऊन आंबिवलीला घरी जाण्यासाठी निघाले होते. तर आरोपी यादव हा वडिलांसोबत सीएसटीवरून टिटवाळा कडे जाणाऱ्या लोकलमधील लगेज डब्यात प्रवास करीत होता. ही टिटवाळाकडे जाणारी लोकल कल्याण रेल्वे स्थनाकात येताच, बबन यांनी घाई घाईने लगेजच्या डब्बात चढले होते. त्यावेळी आरोपी यादवच्या वडिलांच्या पायावर बबन यांचा गर्दीमुळे पाय पडला. त्यांच्यातील हा वाद एवढा विकोपाला गेला आणि मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.

दोन प्रवाशांच्या भांडणात एकाचा मृत्यू : कल्याण लोहमार्ग पोलिसांना गुरुवारी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी ही माहिती मिळाली. लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बबन यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या हत्येप्रकरणी मृतक बबन यांचा मुलाच्या तक्ररीवरून कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपी यादव याला अटक केली आहे. आज शुक्रवारी दुपारच्या सुमारास कल्याण रेल्वे न्यायालयात आरोपीला हजर करण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा : BJP MLA Son Caught Taking Bribe : भाजप आमदाराच्या मुलाला लाच घेताना रंगेहाथ पकडले, घरातून 6 कोटी रुपये जप्त

Last Updated : Mar 3, 2023, 4:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.