नवी मुंबई - कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे असे एकीकडे वाटत असतानाच मंगळवारी नवी मुंबईत 63 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. सकारात्मक बाब म्हणजे मंगळवारी 23 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता नवी मुंबई शहरात धोक्याची पातळी ओलांडली आहे. शहरात आत्तापर्यंत 1785 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले असून पैकी 11 हे इतर ठिकाणचे रहिवासी होते. आतापर्यंत नवी मुंबईत 10 हजार 539 लोकांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. यामध्ये 7 हजार 897 जण निगेटिव्ह आले असून, 866 जणांचे तपासणी अहवाल येणे प्रलंबित आहे.
सद्यस्थितीत नवी मुंबई शहरात राहणाऱ्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 1 हजार 774 इतकी आहे. मंगळवारी 63 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर 23 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 802 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून घरी परतले आहेत. मंगळवारी दोन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, आतापर्यंत 54 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.