ETV Bharat / state

पनवेल पालिका हद्दीत सामाजिक अंतराचे नियम न पाळणारी 57 दुकाने 'सील' - पनवेल महापालिका बातमी

पनवेल महापालिका हद्दीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या सूचना व नियमांचे पालन न करणाऱ्या 57 दुकानदारांवर कारवाई करत त्यांची दुकाने सील करण्यात आली आहेत.

सील केलेले दुकान
सील केलेले दुकान
author img

By

Published : Jun 23, 2020, 7:26 AM IST

नवी मुंबई - मिशन बिगिन अगेन अंतर्गत टाळेबंदीत सशर्त शिथीलता झाल्यापासून नागरिक मुक्त झाल्यासारखे वावरताना दिसत आहेत. टाळेबंदीत शिथीलता करताना सामाजिक अंतराचे पालन करणे, सॅनिटायझरचा वापर करणे व तोंडाला मास्क लावणे बंधनकारक असल्याचे सांगितले होते. मात्र, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई करत त्यांची दुकाने सील करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका हद्दीतील अनेक जण कामानिमित्त दुसऱ्या शहरात ये-जा करतात. त्याचबरोबर महापालिका हद्दीतील दुकाने सम व विषम तारखेला उघडण्याच्या सुचना पालिका प्रशासनाने दिल्या होत्या. मात्र, अनेक दुकानदारांनी दुकाने सुरुच ठेवली होती. त्यामुळे दुकानांमध्ये मोठ्याप्रमाणात ग्राहकांची गर्दी होत होती. गर्दी नियंत्रणात आणण्याचे काम हे दुकानदारांचेच होते. पण, काही ठिकाणी दुकानदारांनी सामाजिक अंतराचे नियम पायदळी तुडवत गर्दी नियंत्रणात ठेवली नाही. अशा 57 दुकानांवर मागील दोन दिवसांत पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.

ही कारवाई उपायुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नियंत्रणाखाली चारही प्रभागात करण्यात आली. यापुढेही अशी कारवाई सुरुच राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच सामाजिक अंतराचे पालन न करणाऱ्या दुकानदारांवर साथरोग अधिनियम कायदा 1897 नुसार गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. यामुळे सर्वत्र सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटाझरने सतत धुणे व तोंडाला मास्क लावत सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी केले.

हेही वाचा - पनवेलमध्ये कोरोनाचा वाढता प्रभाव; 'मेट्रोपोलीस' लॅब करणार साडेचार कोटीच्या मोफत चाचण्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.