ETV Bharat / state

Women Missing From Thane: ठाण्यातून ५३५ महिला झाल्या गायब; महिला गेल्या कुठे? धर्मांतराच्या जिहादाचा आशिष शेलारांचा संशय - महिला गायब

राज्यात सध्या चार प्रकारचे जिहाद आहेत. यात लव्ह जिहाद, इलेक्ट्रॉनिक्स जिहाद, सेवा(सर्व्हिस) जिहाद आणि पॉवर जिहाद अशा प्रकारचे जिहाद सुरूच आहेत. जिहादचे वारे वाहत आहे. एका वर्षात देशातून २ लाख महिला गायब झालेल्या आहेत. तर ठाण्यात एका वर्षात ५३५ महिला गायब झाल्याची नोंद पोलिसांकडे दाखल असल्याचा दावा आणि आरोप भाजप नेते करत आहेत. त्यामुळे गृह विभाग आणि पोलीस या विषयाकडे कधी गंभीरपणे घेणार? असा सवाल विचारला जात आहे.

women missing from Thane in religion conversion
ठाण्यातून ५३५ महिला झाल्या गायब
author img

By

Published : Jun 21, 2023, 7:16 AM IST

ठाण्यातून ५३५ महिला गायब- आशिष शेलार

ठाणे : जिहादच्या चार प्रकारात लव्ह जिहाद हा प्रकार आहे. जर जिहाद नाही तर श्रद्धा वालकरसारखे प्रकार घडले नसते. ज्या फ्रिजमध्ये श्राद्धाच्या शरीराचे तुकडे ठेवले होते. त्याच फ्रिजमधील पाण्याची बाटली घेऊन पाणी पिणे हि राक्षसी प्रवृत्ती असल्याचे ही सांगितले जात आहे. इलेक्ट्रॉनिक्स जिहादबाबत इलेक्ट्रॉनिक्स जिहादची सुरुवात मुंब्रा परिसरातूनच झाली, असाही आरोप सर्वच स्तरातून होतो आहे. ऑनलाईन गेमच्या माध्यमातून धर्मांतर करणारा शाहनवाज नावाचा तरुण धर्मांतर घडवितो हे विशेष आहे. तिसरा जिहाद आहे सेवा(सर्व्हिस) जिहाद. यामध्ये डिलिव्हरी करणारे कर्मचारी हे ठराविक जातीचेच का आढळतात? असा प्रश्न भाजप नेत्यांनी उपस्थित केला आहे. चौथा जिहाद हा पॉवर जिहाद असलयाचे स्पष्टीकरण आशिष शेलार यांनी करून पुढे भाषणात खळबळ उडवून दिली.

ठाण्यात ५३५ महिला गायब : जिहाद याची चिरफाड करून सामाजिक व्यवस्था कशी बसविण्यात आलेली आहे, याचे उदाहरण देत जिहादच्या झळा ज्यांना पोहचल्या त्यांची व्यथाही आशिष शेलार यांनी मांडली. आशिष शेलार म्हणाले जिहादच्या माध्यमातून देशात एका वर्षात २ लाख महिला गायब झाल्याचा आरोप केला. एवढेच नाही तर ठाण्यातील ५३५ महिलाही गायब झाल्याचा आरोप शेलार यांनी करीत या महिला गायब झाल्याच्या तक्रारी आणि नोंदी ठाणे पोलिसांकडे आहेत, असा दावाही केल्याने एकच खळबळ उडाली.

महिला गायब झाल्याचे वास्तव : लव्ह जिहाद जेवढा गंभीर आहे, त्यापेक्षाही इलेक्ट्रॉनिक्स जिहाद गंभीर आहे. त्याची सुरुवात मुंब्र्यातून झालेली आहे. तर सर्व्हिस जिहाद आणि पॉवर जिहाद हे देखील घटक आहेत. स्वीगी, पिझ्झा सारखे डिलिव्हरी बॉईज ठराविक धर्माचे लोक पाहायला मिळतात, असेही स्पष्टीकरण दिले. धर्मांतराच्या जिहादामुळे एका वर्षात देशातून २ लाख महिला गायब झाल्याचे वास्तव आहे. तर ठाण्यातून एका वर्षात ५३५ महिला गायब असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे, हे गंभीर आहे. कुठे गेल्या या महिला, कुठल्या कमला लावल्या आहेत. सर्वच महिला वाममार्गाला लावल्या असे नाही. पण महिला गेल्या कुठे? असा सवाल उपस्थित केला.

पॉवर जिहाद : महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे गठन झाले, तेव्हाच पॉवर जिहादचे दर्शन घडल्याचा गौप्यस्फोट भारतीय जनता पक्षाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. सत्तेच्या भुकेल्या(पॉवर हंग्री)जिहादींना धडा शिकविण्यासाठी सजग राहा असे आवाहन ही आशिष शेलार यांनी जनतेला केले. देशावरील वैचारिक हल्ले, सामाजिक भेद निर्माण करणारी प्रवृत्ती, आणि राष्ट्रीय एकात्मतेला दिले जाणारे आव्हान याबाबतचे सत्य उलगडण्यासाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो. दरम्यान यावेळी बोलताना आमदार आशिष शेलार यांनी ओ.श्रुती यांनी धर्मांतरणाबाबत मांडलेल्या आपबीतीतुन समाजासमोर प्रश्न ठेवुन विचार करायला लावल्याचे नमुद केले. केवळ धर्मांतरण नाही तर हे हिंदु आणि राष्ट्र यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.

जिहादींना धडा शिकवण्याचे आवाहन : जगण्यातील खरा मार्ग हिंदु पद्धतीत असुन संविधानातही पंथनिरपेक्ष बना असे लिहिले आहे. हिंदु धर्म प्राचीन व सोशिक आहे. फ्रिडम ऑफ रिलिजन तसेच फ्रिडम ऑफ मुव्हमेंट असले तरी या सर्व कलमांना 'पण' आहे. धर्मातरण नाही तर हे मतमतांतरण करताना मतांसाठी तुष्टीकरण सुरु असुन त्यातुनच आंतकवाद जन्म घेत आहे. महाविकास आघाडीची बांधणी झाली तेव्हाच पॉवर जिहाद दिसुन आल्याचा गौप्यस्फोट करून आमदार शेलार यांनी राज्यातीळ महाविकास आघाडीवर टीका केली. उद्याच्या व्यवस्थेसाठी आता उद्धवजींना समर्थन द्या. अन्यथा काँग्रेसचे समर्थनाचे पत्र उद्धवजींना जाण्याचा मुद्दाच काय? त्यानंतर सोनिया गांधीनी काँग्रेसचे समर्थन जाहिर केले. काझी औरंगजेबासोबत जाणाऱ्या तसेच सावरकरांचे धडे वगळणाऱ्या काँग्रेससोबत उद्धव ठाकरे मैत्री करतात, हा षडयंत्र व कटाचा भाग असल्याचा भांडाफोड केला. आज हा पॉवर जिहाद गंभीर वळणावर आहे, घरात शिरून जिहाद केला जातोय. तेव्हा सजग राहुन या सत्ताभुकेल्या जिहादींना धडा शिकवण्याचे आवाहन भाजप नेते शेलार यांनी केले.

हेही वाचा :

  1. Pankaja Munde On Love Jihad : पंकजा मुंडे म्हणाल्या, 'लव्ह जिहाद चुकीचे, पण..'
  2. MP Love Jihad: अनामिका दुबे झाली उज्मा फातिमा... आई-वडिलांनी जिवंतपणीच मुलीचे केले पिंडदान, छापल्या श्रद्धांजलीच्या पत्रिका
  3. Mobile Jihad: 'मोबाईल जिहाद' मास्टर माईंड शाहनवाजला आज न्यायालयात हजर केले जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.