नवी मुंबई - कोविड-१९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नवी मुंबईत मिशन ब्रेक द चेनच्या अंतर्गत नवी मुंबई मनपाच्या वतीने विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्या अनुषंगाने मॉलमध्ये येणाऱ्या नागरिकांची शुक्रवारी, शनिवारी व रविवारी कोरोना टेस्ट करणे बंधनकारक आहे. मात्र सिवूडस येथील ग्रँड सेंटर व वाशी येथील इनॉर्बिट मॉलमध्ये मात्र कोणत्याही टेस्ट न करता सरसकट प्रवेश दिला जात होता. त्यामुळे या दोन्ही मॉलला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला व तो नवी मुंबई मनपाने वसूल केला आहे.
हे ही वाचा - शेअर बाजार निर्देशांक 1200 अंशाने वधारला; गाठला पुन्हा 50,000 चा टप्पा
टेस्टचे आदेश देऊनही इनॉर्बिट व ग्रँड सेंटर मॉलकडून नियमांची पायमल्ली -
दर शुक्रवारी दुपारी ४ नंतर व शनिवारी व रविवारी अँटीजेन टेस्ट केल्याशिवाय व टेस्टचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याशिवाय मॉलमध्ये प्रवेश दिला जाणार नसल्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानंतरही ग्रँड सेंटर इनॉर्बिट मॉलकडून सरसकट सर्वांना प्रवेश दिले गेले व मॉलमध्ये येणाऱ्या लोकांची टेस्टही केली जात नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दोन्ही मॉल आस्थापनाला प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असल्याची माहिती आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली आहे.
हे ही वाचा - सचिन वाझेंची आणखी एक गाडी एनआयएने केली जप्त