ठाणे - उल्हासनगर येथील साई सिद्धी या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे. यात ७ जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आहे. तर 3 ते 4 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (२८ मे) रात्री 9 वाजताच्या सुमारास उल्हासनगर येथील नेहरू चौकातील बँक ऑफ बडोदा समोरील साई सिद्धी या इमारतीचा स्लॅब कोसळला. घटनास्थळी उल्हासनगर अग्निशमन दलाचे जवान, पोलीस आणि रुग्णवाहिका उपस्थित आहेत.
७ मृत्यू, 4 अडकल्याची भीती
या दुर्घटनेत आतापर्यंत ७ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, अद्याप 3 ते 4 व्यक्ती इमारतीमध्ये अडकल्याती भीती व्यक्त केली जात आहे. उल्हासनगर अग्निशमन पथकाकडून शोधकार्य सुरू आहे. घटनास्थळी मदतीसाठी ठाणे महानगरपालिकेची TDRF Team हजर झाली आहे.
या घटनेत ०१ व्यक्ती जखमी व ०७ व्यक्तींचे मृतदेह सापडले असून, इमारतीमध्ये अडकलेल्या व्यक्तीचा शोधकार्य सुरू आहे. जखमी व्यक्तीला मध्यवर्ती रुग्णालय उल्हासनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
*जखमी व्यक्तीचे नावे खालीलप्रमाणे:*
१) अलगोत नायडर ( पु/ वय ६० वर्ष)
*मृत व्यक्तीचे नावे खालीलप्रमाणे.*
१)पुनीत बजोमल चांदवाणी (पु/वय १७ वर्ष)
२ ) दिनेश बजोमल चांदवाणी (पु/वय ४० वर्ष)
३) दीपक बजोमल चांदवाणी (पु/वय ४२ वर्ष)
४) मोहिनी बजोमल चांदवाणी (स्त्री /वय ६५ वर्ष)
५) कृष्णा इनूचंद बजाज (पु/वय २४ वर्ष)
६) अमृता इनूचंद बजाज (स्त्री /वय ५४ वर्ष)
७) लवली बजाज
हेही वाचा - नाशिक : पिंपळगाव टोलनाक्याजवळ पुष्ट्याने भरलेल्या ट्रकला भीषण आग