ETV Bharat / state

धक्कादायक ! ग्रीट पावडरमध्ये गुदमरून ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू - thane child death news

एका ४ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या खडी मशीन परिसरात आढळून आला. हा चिमुरडा आपल्या मित्रासह त्या परिसरात खेळत असताना ग्रीट पावडर त्याच्या अंगावर पडल्याने त्यात त्याच्या गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

4 Years child death in thane
धक्कादायक ! ग्रीट पावडरमध्ये गुदमरून ४ वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू
author img

By

Published : Mar 8, 2021, 9:44 PM IST

ठाणे - एका ४ वर्षीय चिमुरड्याचा मृतदेह घरापासून काही अंतरावर असलेल्या खडी मशीन परिसरात आढळून आला. हा चिमुरडा आपल्या मित्रासह त्या परिसरात खेळत असताना ग्रीट पावडर त्याच्या अंगावर पडल्याने त्यात त्याच्या गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना अंबरनाथ शहरातील बुआपाडा परिसरात असलेल्या खडी क्रशर मशीनच्या नजीक घडली आहे. सलाउद्दीन सफीउल्लाजान शेख असे दुर्दैवी मृत्यू झालेल्या चिमुरड्याचे नाव असून याप्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

बेपत्ता झाल्याची तक्रार होती दाखल
अंबरनाथ शहरातील बुवापाडा परिसरातील एका चाळीत सफिउल्लाजान मोहम्मद शेख (३७) हा बिगारी काम करणारा मजूर राहतो. त्याचा ४ वर्षीय मुलगा सलाउद्दीन हा शनिवारी सकाळी शेजारील मुलांसोबत खेळायला गेला होता. सायंकाळपर्यंत तो घरी आला नव्हता. त्यामुळे मुलाच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला, आजूबाजूला चौकशी केली. मात्र त्याचा पत्ता लागला नाही. शेवटी अंबरनाथ पोलीस ठाण्यात साफिउल्लाजान शेख यांनी मुलाच्या बेपत्ता विषयी तक्रार नोंदविली होती. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात इसमाच्या विरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदविला होता.

दुसऱ्या दिवशी मृत अवस्थेत आढळला चिमुरडा
रविवारी सकाळच्या सुमारास सफिउल्लाजान यांच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या खडी मशीन परिसरात ग्रीडच्या ढिगाऱ्याजवळ सलाउद्दीनचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सलाउद्दीनचा मृतदेह ताब्यात घेतला व उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

खडीमशीन परिसरात मुलगा खेळत असताना खडी मशीनमधील ग्रीट पावडर जेसीबीने हलविण्यात येत होती. तेव्हा संपूर्ण ग्रीट पावडर चिमुकल्याच्या अंगावर पडली. यातून त्याला बाहेर पडणे शक्य झाले नाही. जेसीबी यंत्र चालवणाऱ्या चालकाला देखील हा चिमुकला ग्रीट पावडरच्या खाली अडकल्याचे दिसले नाही. मात्र हा सर्व प्रकार त्याच्यासोबत खेळणाऱ्या त्याच्या मित्राला दिसली होती. मात्र भीतीपोटी तो काहीही बोलला नाही. दरम्यान, या खडी मशीन परिसरात संरक्षक भिंत नसल्याने ही घटना घडली असल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे.

खडी मशीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
शविच्छेदनानंतर सलाउद्दीनचा मृतदेह त्याच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. आज सायंकाळी सलाउद्दीनचा त्याच्या नातेवाईकांनी अंत्यविधी केला. तर मृत मुलाच्या नातेवाईकने खडी मशीन मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मात्र या घटनेमुळे बुवापाडा परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.