ETV Bharat / state

शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू; पालिकेचा निष्काळजी पणा? - शौचालयाच्या टाकीत पडून चिमुकलीचा मृत्यू

शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काशीमीरा परिसरात घडली आहे. रविवारी सायंकाळी लहान मुले फटाके फोडत होते. त्यामध्ये आसिफा देखील होती. मात्र, ती त्या शौचालयाच्या टाकीत पडल्याचे कोणाच्याच लक्षात आले नाही.

शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू

author img

By

Published : Nov 16, 2020, 10:27 PM IST

मीरा भाईंदर(ठाणे)- शौचालयाच्या टाकीत पडून चार वर्षाच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना काशीमीरा परिसरात घडली आहे. दिवाळीच्या निमित्ताने काशीमीरा परिसरतल्या पुलाखाली लहान मुले फटाके फोडत होते. त्यावेळीही घटना घडली. रविवारी सायंकाळच्या सुमाराही घटना घडली आहे. आसिफा मुस्तफा अन्सारी असे मृत मुलीचे नाव आहे.

पोलिसांनी घेतला शोध-
मीरा भाईंदर शहरातील काशीमीरा परिसरातील निलकमल नाका जवळ नवीन शौचालय बांधण्यात आले आहे. त्याच्या बाजूला असलेल्या मोकळ्या ठिकाणी रविवारी सायंकाळी लहान मुले फटाके फोडत होते. सर्व मुले फटाके फोडून घरी परतले. मात्र, त्यांच्यासोबतच फटाके फोडणारी आसिफा अन्सारी घरी आलीच नाही. त्यामुळे तिचा शोध सुरू केला. त्यानंतर पोलीस ठाण्यात ती बेपत्ता झाल्याची तक्रारही दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिलांनी काशीमीरा भागाची पाहणी केली असता, पुला खाली असलेल्या शौचालयांच्या टाकीत आफिफाचा मृतदेह आढळून आला.

पालिकेचा निष्काळजीपणा -

या शौचालयाच्या टाकीला जर झाकण असते तर चिमुकलीचा जीव वाचला असता, पालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप आसिफाच्या कुटुंबातील सदस्यांनी केला आहे. तसेच या प्रकरणी पालिका प्रशासना मधील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. याबाबत मनपा आयुक्त डॉ. विजय राठोड यांनी भेट घेऊन कारवाईची मागणी करणार, अशी माहिती जेष्ठ नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.