ठाणे - कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आधारवाडी कारागृहात सध्या १९२२ कैदी असून यापैकी ३० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित कैद्यांची तब्येत ठीक असून त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.
खळबळजनक ! कल्याणच्या आधारवाडी कारागृहातील ३० कैद्यांना कोरोनाची लागण
एखाद्या कैद्याला थंडी - ताप आल्यास कारागृहात विलगीकरण कक्षही बनवण्यात आला आहे. कोरोनाची लक्षणे असणाऱ्या कैद्यांना तात्पुरत्या स्वरूपात याठिकाणी ठेवण्यात येते. तसेच डॉन बोस्को शाळेमध्येही विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला असून नवीन कैद्यांना त्याठिकाणी ठेवले जात आहे.
Aadharwadi Jail
ठाणे - कल्याणच्या आधारवाडी कारागृहात कोरोनाने शिरकाव केला आहे. कारागृहात शिक्षा भोगणाऱ्या ३० कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. आधारवाडी कारागृहात सध्या १९२२ कैदी असून यापैकी ३० कैद्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित कैद्यांची तब्येत ठीक असून त्यांना उपचारासाठी ठाणे येथील सरकारी रुग्णालयात नेण्यात येत असल्याची माहिती कारागृहाचे अधीक्षक अंकुश सदाफुले यांनी दिली.
Last Updated : Apr 20, 2021, 7:43 PM IST