ठाणे - बदलापूर शहरात आज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत 29 रुग्णांची भर पडली आहे. तर, अंबरनाथ शहरात नव्याने 6 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आज बदलापूर शहरात आढळून आलेल्या रुग्णांमध्ये तब्बल 22 रुग्ण हे बाधित व्यक्तीच्या संपर्कातील आहेत. तर दोन रुग्णांना संसर्ग कसा झाला हे समजू शकले नाही. उर्वरित 5 रुग्णांमध्ये एक नर्स, एक प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारा कर्मचारी, एक मुंबई पोलीस आणि दोन जण लॅब टेक्निशियन आहेत. त्यामुळे, बदलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 261 इतकी झाली आहे.
130 रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत. तर 124 रुग्णांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पालिकेला आज 52 जणांचे कोरोना अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 29 अहवाल पॉझिटिव्ह आणि उर्वरित अहवाल निगेटिव्ह असल्याची माहिती नगरपालिका प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
दरम्यान, अंबरनाथ शहरात आज नव्याने 6 रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासोबतच शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 214 झाली आहे, तर आतापर्यंत 7 रुग्ण दगावले आहेत. तसेच 124 रुग्णांवर सध्याच्या घडीला उपचार सुरू आहेत. 83 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.