ETV Bharat / state

Investment Fraud Case: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या नावाखाली सख्ख्या भावांकडून व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा - दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने

शेअर मार्केटच्या नावाने अनेक भामटे गुंतवणुकीच्या नावाखाली पैसे उकळत असल्याच्या घटना राजरोसपणे घडत आहेत. अश्याच प्रकारे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक दामदुप्पटीने पैसे मिळवून देण्याच्या बहाण्याने दोन सख्ख्या भावांनी एका रियल इस्टेट व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा घातल्याची घटना उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणी दोन सख्ख्या भावांवर भिवंडी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोज काळुराम खरे व सूरज काळुराम खरे अशी गुन्हा दाखल झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.

Investment Fraud Case
व्यापाऱ्याला २० लाखांचा गंडा
author img

By

Published : Jun 23, 2023, 9:24 PM IST

ठाणे : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार प्रमोद प्रभाकर जाधव हे भिवंडी शहरातील कोंबडपाडा परिसरातील आकाश अपार्टमेंटमधील बी-विंगच्या रूम नं.४०२ मध्ये कुटुंबासह राहत आहेत. उदरनिर्वाहासाठी ते रियल इस्टेट एजंटचा व्यवसाय करत आहेत. दरम्यान प्रमोद यांना रियल इस्टेट व्यवसायात आर्थिक मंदी आल्याने ते कुठेतरी पैसे गुंतवणूक करून दरमहा ठराविक नफ्याच्या शोधात होते. त्यावेळी भिवंडी महापालिकेमध्ये सफाई कामगार असलेला मनोज खरे आणि त्याचा सख्खा भाऊ राष्ट्रवादीचा युवा नेता समजत असलेला सूरज खरे यांचेकडे बचत करून एक ठराविक रक्कम नफा मिळणे बाबतची माहिती मिळाली होती. त्यानुषंगाने दोघा भावांनी फिर्यादीला धामणकर नाका परिसरातील पद्मानगर, सिटी सेंटर बिल्डींगच्या पहिल्या मजल्यावरील गाळा नं. ११३ येथे बोलावून आरोपी सूरजने सांगितले की, माझा भाऊ मनोज खरे यांनी काँटेरा लिंक प्रायवेट लिमिटेड नावाची कंपनी सुरू केली आहे. सदर कंपनीचा सूरज काळूराम खरे हा डायरेक्टर आहे.

नोटरी करून करारनामा : काँटेरा लिंक प्रायवेट लिमिटेड कंपनीत निरामीती शेअर्स (Niramiti shares) मध्ये इतरांचे पैसे गुंतवणुकीचे काम करतो. त्यांना दरमहा ठराविक रक्कम नफा मिळवून देत असतो, असे सांगून आरोपींनी प्रमोदला १ लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा १५०० ते २००० रुपये ठराविक रक्कम असा नफा मिळेल अशी हमी दिली. त्यामुळे प्रमोदने प्रथम १२ एप्रिल २०२३ रोजी ४ लाखांची गुंतवणूक केली. त्या मोबदल्यात आरोपींनी जाधव यांना प्रति महिना ४ हजार ५०० रुपये प्रमाणे देण्यास सुरू केले. त्यानंतर १३ एप्रिल ते १० ऑक्टोबर २०२३ पर्यंत प्रमोदने आरोपी सूरज व मनोज यांच्या खात्यात २० लाख रुपये जमा केले आहेत. जमा केलेल्या रक्कमेचा वारंवार नोटरी करून करारनामाही करण्यात आला आहे.

दिलेले धनादेश बाऊन्स : बरेच दिवस उलटूनही गुंतवणुकीचा नफा आरोपी देत नसल्याचे प्रमोदने आरोपी भावांकडे रक्कम परत मिळण्यासाठी तगादा लावला असता आरोपींनी धनादेश दिले. मात्र ते सर्व धनादेश बँकेत अपुरा निधी असल्याने (बाऊन्स) परत आले आहेत. तसेच प्रमोदने त्याचे १४ लाख ६८ हजार रुपये आरोपी भावांकडे वारंवार मागणी करून त्यांनी परत केले नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने प्रमोदने भिवंडी शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी मनोज व सूरज या दोघा भावांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून घटनेनंतर आरोपी फरार आहेत. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बारेला करीत आहेत.

हेही वाचा:

  1. Nashik Crime News : मध्यरात्री रेल्वे स्थानकावर थांबणे पडले महागात; विवाहितेवर अत्याचार
  2. Pune Crime News: कामाचे पैसे मागितले म्हणून पुण्यात 'या' भाजप नेत्याच्या पुतण्याकडून लेबर कॉन्ट्रॅक्टरला जबर मारहाण
  3. Male Travelers Arrested: पुष्पक एक्सप्रेसमध्ये महिलांच्या कोचमधून प्रवास करणाऱ्या पाच पुरुषांना अटक

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.