ठाणे - कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात दिवसागणिक कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात संख्या वाढत आहे. शहरात गेल्या २४ तासात नव्याने १८५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तर आतापर्यत ५५ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आह. एकाच दिवशी १८५ कोरोनाचे रुग्ण आढळण्याची ही पहिलीच वेळ असल्याने महापालिका क्षेत्रातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात चाळ आणि झोपडपट्ट्यांत वाढल्याचे दिसून आले. कल्याण डोबिंवली क्षेत्रातील सध्या तब्बल ९२३ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. रुग्णालयातून कोरोनातुन मुक्त होऊन घरी जाण्याऱ्या रुग्णांची संख्या ९३३ वर पोहोचली आहे. तर आजपर्यत मृतांचा एकूण आकडा ५५ वर गेला आहे.
महापालिका प्रशासनाने रुग्णांची विभागवार माहिती आजपासून पत्रकरांना देणे बंद केल्याने महापालिका हद्दीत आज आढळून आलेले १८५ रुग्ण कुठल्या परिसरातील आहेत हे समजू शकले नाही. आजपर्यंत महापालिका हद्दीत १ हजार ९११ रुग्णांची नोंद असल्याचे सांगण्यात आले.
पावसाळ्याच्या सुरवातीलाच कोरोनाबाधितांचा आकडा वाढण्याची शक्यता जास्त वाढल्याने नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून व्यवहार करावे. तसेच नागरिकांनी सरकारने आणि पालिका प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केल्यासच कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ शकतो. मात्र, शहरात नागरिकांकडून सूचनांचे पालन सूचनांचे पालन होत होताना दिसत नाही. त्यामुळेच आजच्या दिवसात सर्वात मोठी म्हणजे १८५ रुग्णांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, महापालिका प्रशासनाने एक दिवसाआड दुकाने सुरु करण्याची परवानगी दुकानदारांना दिली आहे. मात्र दोन्ही बाजूने दुकानदार व्यवसाय करत आहेत. त्यामुळे काही दुकानदारांवर गुन्हेदेखील दाखल करण्यात आले. नागरिकही पावसाळ्यापूर्वीच्या खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरल्याचे दिसून येत आहे.