ठाणे - १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणाला संबंधित मुलीने नकार दिला. यानंतर वैफल्यग्रस्त तरुणाने मुलीच्या घरात शिरूर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. तसेच स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले आहे.
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने वार; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
१४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणाला संबंधित मुलीने नकार दिला. यानंतर वैफल्यग्रस्त तरुणाने मुलीच्या घरात शिरूर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. तसेच त्याने स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर चाकूने वार; आरोपीचा आत्महत्येचा प्रयत्न
ठाणे - १४ वर्षाच्या अल्पवयीन मुलीकडे लग्नाची मागणी करणाऱ्या तरुणाला संबंधित मुलीने नकार दिला. यानंतर वैफल्यग्रस्त तरुणाने मुलीच्या घरात शिरूर तिच्या गळ्यावर धारदार चाकूने वार केले. तसेच स्वतःचाही गळा चिरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना एकतर्फी प्रेमातून घडल्याचे समोर आले आहे.
भिवंडीतील कामतघर-फेणेगाव येथे घडलेल्या प्रकरणात संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. आरोपी तरुणासह पीडित मुलीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आरोपी तरुणाचे वर्षभरापासून त्याच्या शेजारील चाळीत राहणाऱ्या चौदा वर्षाच्या मुलीवर प्रेम होते. यानंतर त्याने मुलीला लग्नासाठी मागणी घातली. मात्र, पीडित मुलीसह तिच्या आईने देखील यासाठी नकार दिला. त्यामुळे वैफल्यग्रस्त आरोपीने मंगळवारी(२१ एप्रिल) सायंकाळच्या सुमाराला पीडितेच्या घरात प्रवेश केला. यावेळी मुलगी घरात एकटीच असल्याने त्याने आतून दरवाजा लावला; आणि धारदार चाकूने तिच्या गळ्यावर वार केले. यानंतर त्याने स्वतःचा देखील गळा कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या चाकू हल्ल्यात दोघेही गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी कळवा येथील शिवाजी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
प्रकरणी मुलीच्या आईच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी आरोपी विरोधात भादंवि कलम ३०७, ३५४ (ड) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अजय कांबळे करत आहेत.