ETV Bharat / state

नवी मुंबईत 2019 मध्ये महिला अत्याचारात वाढ; १६९ बलात्काराचे गुन्हे दाखल - नवी मुंबई बातमी

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात मालमत्ता, अपघात यांसारखे गुन्हे कमी झाले असले तरी २०१८ पेक्षा २०१९ मध्ये  ७२ गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. यात महिला आणि फसवणुकीच्या तसेच सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. तसेच गुन्हे शाबिती म्हणजे आरोपीला दोषसिद्ध करण्याच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे.

169-rape-case-file-in-navi-mumbai-in-2019

author img

By

Published : Jan 16, 2020, 8:10 PM IST

नवी मुंबई- येथील नवी मुंबई आयुक्तांलयाच्या हद्दीत २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यात वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने महिला अत्याचार, फसवणूक, अंमली पदार्थ सायबर गुन्हे यात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी २०१९ चा वार्षिक गुन्हे आढावा देण्यासाठी वार्षिक पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली.

महिला अत्याचारात वाढ

यावेळी सहपोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, परिमंडळ (एक) पोलीस उपायुक्त पंकज ढहाणे, परिमंडळ (दोन) पोलीस उपायुक्त अशोक दुधे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे उपस्थितीत होते.

हेही वाचा- ...तर संजय राऊतांची जीभ जागेवर राहणार नाही, नारायण राणेंचा 'प्रहार'

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात मालमत्ता, अपघात आणि शरिराविरुद्ध गुन्हे कमी झाले असते तरी २०१८ पेक्षा २०१९ मध्ये ७२ गुन्ह्यांनी वाढ झाली आहे. यात महिला आणि फसवणुकीच्या तसेच सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे. तसेच गुन्हे शाबिती म्हणजे आरोपीला दोषसिद्ध करणे संख्येमध्ये वाढ झाली आहे.

२०१८ पेक्षा २०१९ मध्ये ७२ गुन्हे वाढले आहेत. सायबर गुन्हे तसेच महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे. यात महिला अत्याचाराचे ६०२ गुन्हे दाखल झाले. त्यातील ५८७ गुन्हे उघडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे. यात बलात्काराचे १६९ गुन्हे दाखल असून १६६ गुन्हे उघडकीस आले आहेत. यात १११ बलात्कार हे ओळखीच्या मित्र आणि नातेवाईकांकडून झाले आहेत. फक्त एक बलात्कार हा अनोळखी व्यक्तीकडून झाला आहे, तर विनयभंगाचे २५१ गुन्हे दाखल झाले होते. त्यात २३९ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सायबर गुन्ह्यात वाढ
२०१९ ला सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून ६२ गुन्हे दाखल झाले आहेत. यात ऑनलाईन पेमेंट आणि ओटीपी शेअर केल्याने आर्थिक फसवणूक झाली आहे. सायबर सेलकडे ४१७ तक्रारी आल्या होत्या. त्यापैकी ३५४ अर्ज निकाली काढले आहेत. २०१८ च्या तुलनेत सायबर सेलमध्ये चौपट तक्रारी वाढल्या आहेत. त्याचप्रमाणे दोषसिद्धीचेही प्रमाण वाढल आहे. यात बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न, पोक्सो सारख्या गुन्ह्याचे आरोपी शोधून त्याच्यावर दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आर्थिक
आर्थिक गुन्हे शाखेने ७५ गुन्ह्यात १६४ आरोपींना अटक केली. तर २०१९ मध्ये फरार असेलेले १११ आणि पाहिजे असलेले (wanted) आरोपी २५५ असे ३६६ आरोपींना पकडण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाईत १५४ गुन्हे दाखल केले होते. यात २४५ आरोपी अटक असून २,८ कोटींचे अमली पदार्थ हस्तगत केले.

Intro:

नवी मुंबई आयुक्तांलय हद्दीत २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यात वाढ.

नवी मुंबई:

नवी मुंबई आयुक्तांलयाच्या हद्दीत २०१८च्या तुलनेत २०१९ मध्ये गुन्ह्यात वाढ झाली आहे. ही वाढ प्रामुख्याने महिला अत्याचार फसवणूक, अमली पदार्थ सायबर गुन्हे यात झाली आहे. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी "२०१९ चा वार्षिक गुन्हे आढावा " देण्यासाठी " वार्षिक पत्रकार परिषद"घेतली यावेळी सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर , परिमंडळ 1 पोलीस उपायुक्त पंकज ढहाणे ,परिमंडळ २ पोलीस उपायुक्त अशोक दुधे, गुन्हे शाखा पोलीस उपायुक्त प्रवीणकुमार पाटील, वाहतूक विभाग पोलीस उपायुक्त सुनील लोखंडे उपस्थितीत होते.

नवी मुंबई शहरात गेल्या वर्षभरात मालमत्ता , अपघात आणि शरीराविरुद्ध गुन्ह्यात घट झाली असली तरी २०१८ पेक्षा गुन्ह्यात ७२ गुन्ह्यांनी वाढ झाली आहे ,यात महीला आणि फसवणुकीच्या तसेच सायबर गुन्ह्यात वाढ झाली आहे, तसेच गुन्हे शाबिती म्हणजे आरोपी चा दोषसिद्ध करणे संख्येमध्ये वाढ झाली आहे .
२०१८पेक्षा २०१९ ला ७२ गुन्हे वाढले आहेत , सायबर गुन्हे तसेच ,महिला अत्याचार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे ,यात महिला अत्याचाराचे ६०२ गुन्हे दाखल झाले त्यातील ५८७ गुन्हे उघडण्यात नवी मुंबई पोलिसांना यश आले आहे ,यात बलात्काराचे १६९ गुन्हे दाखल असुन १६६ गुन्हे उघडकीस आले आहेत . यात १११ बलात्कार हे ओळखीच्या मित्र आणि नातेवाईकांकडून झाले आहेत फक्त एक बलात्कार हा अनोळखी व्यक्तीकडून झाला आहे, तर विनयभंग चे २५१ गुन्हे दाखल झाले होते त्यात २३९ गुन्हे उघडकीस आले आहेत

सायबर गुन्ह्यात वाढ

२०१९ ला सायबर गुन्ह्यात वाढ झाली असून,६२गुन्हे दाखल झाले आहेत . यात ऑनलाईन पेमेंट आणि ओटीपी शेअर केल्याने आर्थीक फसवणूक झाली आहे . सायबर सेलकडे ४१७ तक्रारी आल्या होत्या ,त्यापैकी ३५४ अर्जाची निकाली काढले आहेत , २०१८ च्या तुलनेत सायबर सेलमध्ये चौपट तक्रारी वाढल्या आहेत , त्याचप्रमाणे दोषसिद्धीचेही प्रमाण वाढल आहे, यात बलात्कार ,खून ,खुनाचा प्रयत्न , पोस्को सारख्या गुन्ह्याचे आरोपी शोधून त्याच्यावर दोष सिद्ध करण्यात पोलिसांना यश आले आहे ,

आर्थिक
आर्थिक गुन्हे शाखेने ७५ गुन्ह्यात १६४ आरोपीना अटक केले आहे , तर २०१९ ला फरारी असेलेले १११ आणि पाहिजे असलेले (wanted)आरोपी २५५ असे ३६६ आरोपीना पकडण्यात यश आले आहे. त्याचप्रमाणे अंमली पदार्थ विरोधी कारवाईत १५४ गुन्हे दाखल केले होते यात, २४५ आरोपी अटक असून २,८ कोटीचे अमली पदार्थ हस्तगत केले आहेत. .
Byts

पोलीस आयुक्त संजय कुमार

Body:.Conclusion:.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.