ETV Bharat / state

Fake Kidnapping Thane : 16 वर्षीय विद्यार्थीनीने परीक्षेच्या भीती पोटी स्वत:च रचला अपहरणाचा बनाव

दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी कुटुंबासह बदलापूर पश्चिम परिसरात राहते. ती दादर - परळ भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. त्यातच 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास बदलापूर पश्चिम येथील गौरी इस्टेट कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने जात असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ४ अनोळखी तरुणांनी पाठीमागून येऊन नाकाला कपडा लावत बेशुद्ध करत कारमधून अपहरण केले

प्रातिनिधीक छायाचित्र
प्रातिनिधीक छायाचित्र
author img

By

Published : Feb 27, 2022, 4:05 PM IST

ठाणे - एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ४ अनोळखी तरुणांनी भरदिवसा बदलापूर पश्चिम येथील घरच्या रस्त्याने जात असताना अपहरण केल्याची तक्रार मुलीने दाखल केली होती. मात्र त्या १६ वर्षीय विद्यार्थीनीने फिल्मी स्टाईलने रचलेला अपहरणाचा बनाव बदलापूर पोलिसांनी उघडकीस आणला आहे.

'असा' केला अपहरणाचा गुन्हा दाखल

दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेली मुलगी कुटुंबासह बदलापूर पश्चिम परिसरात राहते. ती दादर - परळ भागातील एका शाळेत शिक्षण घेत आहे. त्यातच 23 फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजल्याच्या सुमारास बदलापूर पश्चिम येथील गौरी इस्टेट कॉम्प्लेक्सच्या रस्त्याने जात असताना एका काळ्या रंगाच्या कारमधून आलेल्या ४ अनोळखी तरुणांनी पाठीमागून येऊन नाकाला कपडा लावत बेशुद्ध करत कारमधून अपहरण केले. त्यानंतर कार मुंबईतील दादर भागात एका ठिकाणी थांबल्याने अपहरणकर्त्याच्या तावडीतून पळ काढून दादरला शाळेत असल्याचे तिने वडिलांना सांगितले. मात्र वडील बाहेर असल्याने त्यांनी दादर येथील शाळेतील शिक्षिकेला माहिती दिली. तर घटनेचे गांभीर्य ओळखून शिक्षिकेने तिला घेऊन दादर लोहमार्ग पोलीस ठाणे गाठून अज्ञात ४ व्यक्तीवर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र गुन्हा बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्याने दादर पोलिसांनी २४ फेब्रुवारी रोजी हा गुन्हा बदलापूर पोलीस ठाण्यात वर्ग केला.

...म्हणून रचला अपहरणाचा बनाव

बदलापूर पोलीस पथकाने अपहरण गुन्ह्याचे गांभीर्य पाहून २५ फेब्रुवारीपासून विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याचे घटनास्थळ व त्या रस्त्यावरील अनेक सीसीटीव्ही फुटेज तपासणी केली. मात्र त्यामध्ये कुठली काळ्या रंगाची कार दिसून आली नाही. त्यानंतर पोलिसांनी बदलापूर व दादर रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल करणारी मुलगी दिसून आली होती. विशेष म्हणजे ज्यावेळी तिने अपहरण झाल्याची वेळ सांगितली होती. त्यावेळी ती दादर परिसरात असलेल्या एका सीसीटीव्ही फुटजेमध्ये दिसली. त्यामुळे पोलिसांना तिच्यावरच संशय आल्याने तिची चौकशी केली असता दहावीची परीक्षा येत्या काही दिवसात ऑफलाइन होणार असून परीक्षेचा ताण नको. तसेच मार्कही कमी पडतील, या भीतीने बनाव रचल्याचे बदलापूर पोलिसांच्या तपासात समोर आले आहे.

हेही वाचा - Murder For Ransom Gondia : गोंदियात १० लाखाच्या खंडणीसाठी १७ वर्षीय मुलाची हत्या..

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.