ETV Bharat / state

मीरा भाईंदरमध्ये मंगळवारी कोरोनाचे १५० नवीन रुग्ण, ७ बळी - Mira Bhayandar corona updates

मीरा भाईंदरमध्ये आज (मंगळवार) एकाच दिवशी कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जणांची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे.

COVID HOSPITAL
कोविड रुग्णालय मिरा भाईंदर
author img

By

Published : Jul 22, 2020, 12:08 AM IST

मीरा भाईंदर (ठाणे) - मीरा भाईंदरमध्ये आज (मंगळवार) एकाच दिवशी कोरोनामुळे ७ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १५० जणांची कोरोना चाचणी अहवाल सकारात्मक आला आहे. त्यामुळे १५० नवीन रुग्णांची भर पडली आहे. तसेच ८८ जणांनी आज कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

मीरा भाईंदर शहर कोरोनाच्या विळख्यात अडकल्याचे दिसत असून असून दिवसेगणिक कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रशासनाने मागील पाच दिवसात 'चेस द व्हायरस" या मोहिमेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन तपासणी केली. या मध्ये ५५ नवे रुग्ण आढळून आले. मीरा भाईंदर शहरात आज ४ जणांचा मृत्यू झाल्यामुळे मृत्यूची एकूण संख्या २३३ झाली आहे. तर शहरातील कोरोना मुक्तांची संख्या समाधानकारक आहे. एकूण ५२४७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. आज आढळून आलेल्या रुग्णामध्ये ६८ नवीन तर ८२ जणांना कोरोनाबधितांच्या संपर्कामुळे लागण झाली आहे.

हेही वाचा - राज्यात आज आठ हजार नव्या रुग्णांसह २४६ मृत्यूंची नोंद; तर सात हजार रुग्णांना डिस्चार्ज..

आतापर्यंत मीरा भाईंदर कार्यक्षेत्रात २०२४८ जणांची कोविड-१९ ची चाचणी करण्यात आली यामध्ये १२,८९१ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आला आहे. तर ६,८३४ जणांचा कोरोनाची बाधा झाल्याचे आढळुन आले आहे. ५२३ जणांचा वैद्यकीय अहवाल प्रतिक्षेत आहे. तर १३५४ जणांवर मीरा भाईंदर शहरातील कोविड रुग्णालयात उपचार सुरू आहे. तसेच काही रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.