ETV Bharat / state

LOCKDOWN : पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना - पनवेल रेल्वे स्थानक

लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश,झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हेाती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे.

migrant laborers went home state from Panvel railway station who Stuck in lockdown
पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना
author img

By

Published : May 16, 2020, 3:23 PM IST

नवी मुंबई - लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश,झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील तब्बल 15 हजार 104 मजुरांना विशेष रेल्वेने त्यांच्या स्वगृही पाठविण्यात आले. आतापर्यंत मध्यप्रदेशसाठी 5, झारखंडकरता 2, उत्तरप्रदेशकरता 2 तर बिहार आणि ओरिसा करता प्रत्येक एक-एक रेल्वे सोडण्यात आल्या आहेत.

पनवेल रेल्वेस्थानकातून आतापर्यंत 15 हजार 104 परप्रांतीय मजूर स्वगृही रवाना
कोविड-19 प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून संपूर्ण भारतभर लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर विविध राज्यातील काही मजूर विविध जिल्ह्यात अडकले होते.तसे मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा येथील मजूर व्यक्ती रायगड जिल्ह्यातही अडकले होते. शासन आणि जिल्हा प्रशासन या मजूरांची व्यवस्थित काळजीही घेत होते. लॉकडाऊनचा कालावधी वाढविल्यानंतर मात्र या नागरिकांकडून त्यांच्या स्वगृही जाण्याची मागणी जोर धरु लागल्याने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी शासनस्तरावर प्रयत्न केले. तसेच विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मध्यप्रदेश, झारखंड, बिहार, उत्तरप्रदेश आणि ओरिसा राज्यातील प्रशासकीय यंत्रणेशी संपर्क साधून पुढील समन्वयाबाबतचे नियोजन केले. रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाशांना सुखरुप आपल्या गावाकडे जात असल्याबद्दल आणि कुटुंबाशी भेटण्याचा आनंद मिळणार असल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. जिल्ह्यात अडकलेल्या सर्वांची जेवण व राहण्याची देखील चांगली व्यवस्था करण्यात आली होती. त्यांना आपल्या गावी जाता यावे, यासाठी शासनाने व प्रशासनाने देखील संबंधित राज्यांशी उत्तम समन्वय साधला. बाहेरच्या राज्यातील व्यक्तींना सुखरूप जाता यावे आणि आपल्या जिल्ह्यातील नागरिकांना सुरक्षित गावी येता यावे, यासाठी महाराष्ट्र शासनाचे सातत्याने प्रयत्न सुरूच आहेत.

रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व मजूर व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली हेाती. त्यांना स्वगृही जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, रायगड जिल्ह्याच्या विविध तालुक्यातून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था करण्यात आली होती. शिवाय रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांच्या सोबत जेवणाचे पार्सल, मास्क, साबण, सॅनिटायझरही देण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.