ETV Bharat / state

Thane Crime : शाळकरी मुलीवर अल्पवयीन विद्यार्थाकडून अत्याचार; पीडिता गर्भवती राहिल्याने घटना उघड - पीडिता गर्भवती राहिल्याने घटना उजेडात

ठाणे शहरात एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर १६ वर्षीय अल्पवयीन विद्यार्थाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडिता गर्भवती राहिल्याने घटना उजेडात आली. याप्रकरणी शीळ डायघर पोलिसांनी अल्पवयीन आरोपीला ताब्यात (Thane Crime News) घेतले आहे.

Minor Girl Rape Thane
विद्यार्थाकडून अत्याचार
author img

By

Published : Aug 5, 2023, 10:11 PM IST

Updated : Aug 5, 2023, 10:23 PM IST

ठाणे : एका १४ वर्षीय शाळकरी मुलीवर १६ वर्षीय विद्यार्थ्याने अत्याचार केल्याची घटना उघडकीस (Thane Crime News) आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पीडित शाळकरी मुलगी दोन महिन्यांची गर्भवती राहिल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी ठाणे जिल्ह्यातील शीळ डायघर पोलीस ठाण्यात अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अल्पवयीन विद्यार्थ्याला ताब्यात घेतले आहे.

दोघांमध्ये प्रेम संबंध? : पोलीस सूत्रांकडून मिळलेल्या माहितीनुसार, १४ वर्षीय पीडिता ही एका शाळेत शिक्षण घेत आहे. तर पोलिसांच्या ताब्यात असलेला अल्पवयीन विद्यार्थी हा त्याच परिसरात असलेल्या एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. गेल्या काही महिन्यांपासून दोघांमध्ये ओळख होऊन मैत्री झाली आणि त्या मैत्रीचे रुपांतर प्रेम संबंधात झाले. त्यानंतर नेहमीच शाळा-महाविद्यालयात जाण्याच्या बहाण्याने ते दोघे एकमेकांना भेटत होते. मात्र, त्यांच्या दोघांच्याही घरच्यांना त्यांच्यातील प्रेमसंबंधाची माहिती नव्हती.

कुटुंबाला बसला धक्का : प्रेम जुळल्याने दोघे एकमेकांना भेटत असताना त्या अल्पवयीन विद्यार्थ्याकडून पीडित शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आला. मात्र, यामुळे काय घडेल त्याची कल्पना दोघांनाही नव्हती. त्यातच अत्याचारामुळे पीडित अल्पवयीन मुलीच्या पोटात दुखत असल्याने तिला घरच्यांनी रुग्णालयात नेले. तेव्हा पीडित मुलगी दोन महिन्यांची गरोदर असल्याचे समोर आले. त्यानंतर घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली असता तिच्यावर घडलेला प्रसंग कळला आणि तिच्या कुटुंबाला धक्काच बसला. दरम्यान, पीडित शाळकरी मुलीच्या तक्रारीवरून ४ ऑगस्ट रोजी त्या अल्पवयीन विद्यार्थ्यावर अत्याचार आणि पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली आहे.

पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार : अल्पवयीन मुलीवर बलात्काराच्या यापूर्वीही घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना नागपुरातही घडली होती. यामध्ये लिव्ह-इन पार्टनरच्या 12 वर्षीय मुलीवर बलात्कार करणाऱ्या एका नराधमास नागपूर पोलिसांनी 22 जानेवारी, 2023 रोजी अटक केली होती. 37 वर्षीय आरोपी हा वाठोडा परिसरातील रहिवासी होता. आरोपीच्या महिला पार्टनरने त्याच्याविरुद्ध तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. आरोपी त्याच्या पार्टनरच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करायचा. मागील 1 वर्षांपासून हा प्रकार सुरू होता. आरोपीने पीडितेला गंभीर परिणाम भोगण्याची धमकी दिली होती.

हेही वाचा:

  1. Minor Girl Rape : अल्पवयीन युवतीवर 50 वेळा सामूहिक अत्याचार, औरंगाबादच्या बलात्कार प्रकरणात नवीन खुलासा
  2. Minor Girl Rape : अल्पवयीन मुलीची बलात्कार करून हत्या; कारवाईची मागणी करत संतप्त नागरिकांकडून पोलिसांवर दगडफेक
  3. Minor Girl Rape Case Mumbai : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या व्यवसायिकासह पीडित तरुणीची चुलत बहीण आणि तिच्या पतीला 20 वर्षाची शिक्षा

Last Updated : Aug 5, 2023, 10:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.