नवी मुंबई (ठाणे) - एरोली येथील पाटणी मैदानातील डबक्यामध्ये एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली. त्याचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याचे निदर्शनास येताच अग्निशमन विभागाच्या साहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. अभिषेक गुप्ता (१४) असे मृत मुलाचे नाव आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर दिघा येथील रहिवासी असल्याचे रबाळे पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले.
अंघोळीसाठी गेली होती ४ लहान मुले -
ऐरोली नॉलेज सिटी, पटनी मार्गावरील रेल्वे ट्रॅकला लागून असलेले पाण्याचे डबके आता जीवघेणे ठरू लागले आहे. मैदानात खेळून झाल्यावर ४ लहान मुले पोहण्याकरिता डबक्याजवळ गेले. त्यातील एक मुलगा पाण्यात अंघोळ करण्यासाठी उतरला असता त्याचा डबक्यात बुडून दुर्देवी मृत्यू झाला. याबाबत ऐरोली येथील अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी दुपारी तलावात संशोधन केले. मात्र, कोणत्याही प्रकारचे मृतदेह मिळाले नाही. रात्री ८ वाजता त्या लहान मुलाचा मृतदेह पाण्यावर तरंगू लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्यात गळ टाकून मृत मुलास बाहेर काढले असल्याचे अग्निशमन विभाग अधिकारी संदेश चन्ने यांनी सांगितले.
हेही वाचा - आजही मोनोरेल बंद; ट्रॅकवर पडली झाडाची फांदी
जमिनीच्या वादामुळे डबके बुजवला नसल्याचा आरोप -
ऐरोली नॉलेज सिटी, पटनी मार्गावरील रेल्वे ट्रॅकला लागून असलेले पाण्याचे डबके आता जीवघेणे ठरू लागले आहे. या डबक्याने आतापर्यंत कित्यके लोकांचे जीव घेतले आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये किमान १-२ लोकंचा जीव या डबक्यात होतो. हे डबके १५ फूट खोल असून येथील पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पानवेलींचा गाळ असल्याने एखादा व्यक्ती बुडाल्यास त्याचा मृतदेह शोधणे फार अवघड होते. हे डबके फार जुने असून स्थानिक तेथे मासेमारी करीत येतात. जमिनीच्या वादामुळे अनेकदा मागणी करूनही हे डबके बुजविण्यात आलेले नाही.
या डबक्याच्या शेजारीच आता दिघा रेल्वे स्टेशनचे काम सुरू आहे. त्यामुळे या डबक्याबाबत लवकरच सामंजस्याने निर्णय घेणे गरजेचे आहे अन्यथा हे पटनी मैदानातील जीवघेणे डबके अजून किती जीव घेणार? असा प्रश्न आता दिघावासीय करीत आहेत. याबाबत नवी मुंबई महानगर पालिका, सिडको महामंडळ व स्थानिक राजकीय नेते मंडळींनी यावर योग्य तो तोडगा काढून लवकरात लवकर उपाय करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - कंपनीत पाण्याचा टँकर पुरवण्याच्या वादातून तरुण व्यावसायिकाची निर्घृण हत्या