ETV Bharat / state

ठाणे पोलीस दलातील 14 पोलिसांना कोरोना, ४ अधिकाऱ्यांसह 10 कर्मचाऱ्यांचा समावेश - 14c orona positive police in thane

ठाणे पोलीस सध्या कोरोनाच्या हिट लिस्टवर असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी २४ तास ऑनड्यूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण सर्वाधिक होत असल्याची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे.

14c orona positive police in thane police force
ठाणे पोलिस दलातील 14 पोलिसांना कोरोना
author img

By

Published : Apr 17, 2020, 6:36 PM IST

ठाणे - अट्टल गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे ठाणे पोलीस सध्या कोरोनाच्या हिट लिस्टवर असल्याचे समोर आले आहे. लॉकडाऊनचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी २४ तास ऑनड्यूटी रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या या पोलिसांनाच आता कोरोनाची लागण सर्वाधिक होत असल्याची धक्कादायक आकडेवारी हाती आली आहे. ठाण्यात ४ अधिकाऱ्यांसह १४ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून ७२ हून अधिक पोलिसांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामध्ये मुंब्रा, वर्तकनगर, ठाणे नगर पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

ठाणे पोलिस दलातील 14 पोलिसांना कोरोना

ठाणे पालिका क्षेत्रामध्ये कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सरकारने लॉकडाऊन जाहीर केला असला तरी भाजी, जीवनावश्यक वस्तू आणण्याच्या नावाखाली बाजारात गर्दी होत आहे. या गर्दीला आटोक्यात आणण्याचे मोठे आवाहन पोलिसांसमोर आहे. मात्र, आता पोलीसच कोरोनाच्या विळख्यात सापडत असल्याने चिंतेत भर पडली आहे. याची सुरुवात मुंब्य्रापासून झाली. येथील २ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह काही पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अख्खे पोलीस ठाणेच क्वारंटाईन करण्यात आले. त्यानंतर वर्तकनगर आणि ठाणे नगर पोलीस ठाण्यातील पोलिसांनाही मोठ्या प्रमाणात कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

thane police force
ठाणे पोलिस दलातील 14 पोलिसांना कोरोना

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा आकडा १४ च्या घरात पोहोचला आहे. यामध्ये ४ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. तर ७२ संशयितांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्ट येणे अजून बाकी आहे. त्यामुळे कोरोना बाधित पोलिसांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

thane police force
v ठाणे पोलिस दलातील 14 पोलिसांना कोरोना

पोलिसांवरील कोरोनाचा धोका लक्षात घेता आता मुंबईनंतर ठाण्यातही सॅनिटायझिंग व्हॅनची व्यवस्था करण्यात आली आहे. बंदोबस्त, नाकाबंदी तसेच सर्व पोलीस ठाण्यांमध्ये ठिकठिकाणी ही व्हॅन फिरणार असून निर्जंतुकीकरणाचे काम करणार आहे. याशिवाय पोलिसांच्या सुरक्षेसाठी त्यांना पुरेशा प्रमाणात मास्क, हॅण्ड ग्लोज, पीपी किट,पेस शिल्डही पुरवण्यात आली आहेत. तसेच पोलीस वसाहतींमध्येही मोठ्या प्रमाणात निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली असल्याची माहिती डीसीपी बाळासाहेब पाटील यांनी दिली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.