ठाणे- ४० वर्षीय नराधमाने शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन करून तिचा विनयभंग केला. ही घटना हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. या प्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इर्शाद उर्फ पप्पू (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारा आरोपी इर्शाद उर्फ पप्पू हा शेजारी राहणाऱ्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरात शिरला. त्याने मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून तिच्याशी अश्लील वर्तन केले व तिचा विनयभंग केला. या घटनेप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून हिललाईन पोलीस ठाण्यात नराधम इर्शाद उर्फ पप्पू याच्याविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास स.पो.नि.वगरे करत आहेत.
हेही वाचा- घाम फोडणारी पळापळ! मंगल कार्यालयामध्ये अचानक शिरला साप, अन्..