ETV Bharat / state

Thane News: 113 वर्षाच्या आजी आजही फिट; वाढदिवसाला वाटली ११२ किलो साखर - विठाबाई हे ठाणेकरांचे आकर्षण

कोपरी गावातील विठाबाई दामोदर पाटील या ११३ वर्षाच्या आजी ठाणेकरांचे भूषण आणि आकर्षणही ठरत आहे. कलीयुगात ५० वर्ष जगणे कठीण आहे. मात्र आजीबाई ११३ व्या वर्षात पर्दापण करीत आहेत. नुकताच ११२ पूर्ण केलेल्या आगीचा प्रवास आता ११३ व्या वर्षात झाला. कोपरी गावात वाढदिवस आनंदात साजराही केला. मुलांनी आजीबाईच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ११२ किलो साखरही वाटली. आज विठाबाई हे ठाणेकरांचे आकर्षण आणि कुतूहलाचा विषय झालेला आहे. आपण आजीबाईच्या स्वभाव आणि दिनचर्या या सोबतच त्यांच्या परिवाराची माहिती घेऊ या.

113 year old grandmother
113 वर्षाच्या आजी
author img

By

Published : Feb 16, 2023, 9:20 AM IST

Updated : Feb 16, 2023, 9:34 AM IST

ठाणे: आजीबाई आजही कलीयुगात एकदम फिट आहेत. यावरून जुन्या वातावरण आणि खाण्यापिण्याच्या शुद्धतेची सकस आहाराची महंती पटल्याशिवाय राहत नाही. विठाबाई पाटील यांचा जन्म ठाण्यातच झाला. आजीचे लग्न ११३ वर्षाच्या परंपरेनुसार पाळण्यातच लागले. विठाबाई हळूहळू मोठ्या झाल्या, त्यानंतर त्यांचा वैवाहिक जीवनाला प्रारंभ झाला. काही काळातच त्यांना मुले झाली. आजच्या परिस्थितीत विठाबाई पाटील याना ६ मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. पण आजच्या स्थितीला कोपरी गावात एकत्रित कुटुंब आणि हुकमी एक्का असलेल्या आजीबाईच्या कुटुंबात ३५ माणसे आहेत. विठाबाई आजही तशाच आहेत. शेवटी वयोमानानुसार माणूस हा ५० वर्षानंतर थकून जातो. मात्र आजीबाई विठाबाई या मात्र आजही स्वहस्ते, स्वकामे करतात हा चमत्कार म्हणावा लागेल.

११२ किलो साखर वाटली: विठाबाई पाटील यांचा वाढदिवस २ फेब्रुवारी रोजी कोपरी गावात धडाक्यात साजरा केला. ११२ किलो साखर वाटली आहे. आजही आजीबाई कुटुंबाचे नेतृत्व करीत आहेत. दुसरीकडे आजही आजीबाई ठणठणीत आहेत. आजीबाईला मुले, मुली, सुना, जावई, नातवंडे आणि पणतू यांचाही समावेश आहे. वास्तविक पाहता एवढे भाग्य लाभते कुणाला? पण हेच अद्भुत भाग्य लाभलेले आहे, ते विठाबाईला. बघा नीट, ११३ वर्षाच्या आजीबाई एकदम फिट. ना डॉक्टरची गरज नाही वैद्याची, विठाबाईला कुठलाच आजार नाही. जेवण नेहमीप्रमाणे सुरू आहे. जेवणात काहीही वर्ज्य नाही. मच्छी, मटन, अंडी, दही, आईस्क्रीम, पुरणपोळीसारखे आवडीचे पदार्थाचे सेवन करतात हे विशेष आहे. साठनंतर बिछाना पकडणारी आजच्या पिढीला विठाबाई खरेच एक आदर्श ठरणार आहे, यात शंका नाही.

आजीची दिनचर्या: ११३ वर्षांच्या आजीबाईचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर चालतो. दिनक्रम आणि दिनचर्या चुकली की कुटुंबातील व्यक्तीची गय नाही. आजीबाई वेळेच्या पक्क्या आहेत. जो वेळेची किंमत करतो, वेळ त्याची किंमत करते. हे आजीबाईच्या काटेकोर नियमावलीच्या चाकोरीत जीवन जगण्यावरून स्पष्ट होते. आजीबाई सकाळी ६ वाजता उठतात. काही वेळातच त्यांची अंघोळ होते. त्यानंतर चहा-नाश्ता करतात, आदी पोटोबा आणि नंतर विठोबाप्रमाणे नित्यनियमची देवपूजा, ईश्वराचे दीर्घ आयुष्याबाबत कृतज्ञता व्यक्त करताता. पण देवपूजा रोजची त्यानंतर दुपारी जेवण, काही काळ आराम त्यानंतर संध्याकाळी ठरलेल्या वेळेला चहा आणि रात्री ९ वाजता जेवण आणि नंतर झोपणे अशी आजीची दिनचर्या असते.

नातेवाईकांनाही आठवतात: १०० वर्षाच्या आठवणी आणि घटना अचूक आणि तंतोतंत सांगतात. त्यांची स्मरण शक्ती ही अद्भुतच यात शंका नाही. आजही भेटण्यास येणाऱ्या माणसांना कोण कुठला, कुणाचा मुलगा असे स्पष्टपणे ओळखतात. नातेवाईकांनाही नावानिशी आवाज देतात. आपल्याला अनेक दिवसांपासून भेटण्यास कुठला नातेवाईक आला नाही. कुठला नातेवाईक कुठे राहतो, त्याला किती मुले, किती मुली आणि कुणाची लग्न कुठे केली. तिचा नवरा कुठे नोकरीला आहे. असा डेटा आजही विठाबाई यांच्या डोक्यात फिट आहे. थोडक्यात त्यांचे शरीर थकले असले तरीही त्यांची मेमरी मात्र अजूनही दगडाप्रमाणे टणक आहे.

भाकरीची जागा पिझ्झाने घेतली: एखादा आवडता कुटुंबातील माणूस किंवा नातेवाईक भेटण्यास बरेच दिवस महिने आला नाही तर, आजीबाई नातूला त्याला फोन लावून त्यांच्याशी संवाद साधतात. भाकरीची जागा आज पिझ्झा आणि सॅन्डविचने घेतलेली आहे. सकाळी १० वाजता उठणे आणि बेताल दिनचर्या कामानुसार चालविणे अशा अनेक गोष्टी या आज माणसाला आणि त्यांच्या आरोग्याला घातक ठरत आहे. पण आजीबाई विठाबाईंची दिनचर्या आणि खान पेन हे माणसाला चिरकाळ टिकवले हे आजतरी पिढीला मानावेच लागेल. कारण वेळ आणि दिनचर्या, आहार याचे जिवंत उदाहरण आणि आदर्श हा कोपरी गावातल्या विठाबाई नक्कीच आदर्श ठरतात.

हेही वाचा: Thane News मिरच्यांच्या ठसक्याबरोबरच मसालाचे दरही वाढले बाजारपेठामधील विक्रीवरही परिणाम

113 वर्षाच्या आजी आजही फिट

Last Updated : Feb 16, 2023, 9:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.