ETV Bharat / state

नववर्षाची पार्टी भोवली; तरुणांच्या सतर्कतेमुळे वाचला 'त्याचा' जीव - सतर्कमुळे वाचला जीव

एका तरुणाच्या जीवावर नवीन वर्षाची पार्टी बेतली असती. मात्र, भिवंडीतील दोघांनी त्याचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा ग्रामपंच्यात हद्दीत घडली.

तरुणांच्या सतर्कमुळे वाचला 'त्याचा' जीव
तरुणांच्या सतर्कमुळे वाचला 'त्याचा' जीव
author img

By

Published : Jan 2, 2020, 2:55 AM IST

ठाणे - नवीन वर्षानिमित्त १ जानेवारीला पहाटेपर्यंत सर्वत्र जल्लोष पाहायला मिळतो. तरुण तरुणी यादिवशी मोठ्या प्रमाणाता पार्ट्यांचे आयोजन करतात. यातच एका तरुणाच्या जीवावर नवीन वर्षाची पार्टी बेतली असती. मात्र, भिवंडीतील दोघांनी त्याचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. ही घटना भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा ग्रामपंच्यात हद्दीत घडली.

नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून भिवंडीतील पत्रकार अमृत शर्मा आणि त्यांचा मित्र कल्लू भाई ये दोघेही भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा गावातून घराच्या दिशेने निघाले. यावेळी पहाटेचे दीड ते दोन वाजले होते. यावेळी त्यांना एका दुचाकीखाली तरुणाचा पाय दिसला. त्यांनतर अमृत शर्मा यांनी स्थानिक नारपोली पोलीस ठाण्यात या घटनेची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी ठाण्यावरून एक रुग्णवाहिका येत असून त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करावे, असे शर्मा यांना सांगितले.

काही वेळात त्याठिकाणी रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनतर तरुणाच्या अंगावरून दुचाकी हटविण्यात आली. अमृत शर्मा आणि कल्लू भाई यांनी रुग्णवाहिकेमधील २ जणांच्या मदतीने नारपोली पोलीस ठाण्यासमोरील आरोग्य रुग्णालयात त्या तरुणाला दाखल केले.

तरुणांच्या सतर्कमुळे वाचला 'त्याचा' जीव

तरुणावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून अद्याप तरुण शुद्धीवर आला नसल्याने त्याचे नाव पोलिसांना कळू शकले नाही. दरम्यान पत्रकार शर्मा आणि त्याचा मित्र कल्लूमुळे या तरुणाचा जीव वाचल्याची माहिती अमृत शर्मा यांनी दिली. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Intro:kit 319Body:थर्टी फस्ट बेतली असती जीवावर; मात्र तरुणांच्या सतर्कमुळे वाचला त्याचा जीव

ठाणे : ३१ डिसेंबर रोजी पहाटे पर्यत सर्वत्र नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करीत असतानाच एका तरुणाच्या जीवावर थर्टी फस्ट बेतली असती, मात्र भिवंडीतील दोघां तरुणांनी त्या तरुणाचा जीव वाचवल्याची घटना समोर आली आहे. हि घटना भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा ग्रामपंच्यात हद्दीत घडली आहे.
नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करून भिवंडीतील पत्रकार अमृत शर्मा आणि त्यांचा मित्र कल्लू भाई ये दोघेही भिवंडी - ठाणे मार्गावरील पूर्णा गावातून घराच्या दिशेने पहाटे दीड ते दोन वाजल्याच्या सुमारास जात होते. त्यावेळी एका दुचाकीखाली तरुणाचा पाय दिसला. त्यांनतर अमृत शर्मा यांनी स्थानिक नारपोली पोलीस ठाण्यात या घटनेची दिली असता पोलिसांनी ठाण्यावरून एक रुग्णवाहिका येत आहे. त्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या त्या तरुणाला उपचारासाठी दाखल करावे असे पोलिसांनी पत्रकार शर्मा यांना सांगितले. काही वेळात त्या ठिकाणी रुग्णवाहिका दाखल झाली. त्यांनतर त्या तरुणाच्या अंगावरून दुचाकी हटविण्यात येऊन त्याला अमृत शर्मा आणि कल्लू भाई यांनी रुग्णवाहिकामधील २ जणांच्या मदतीने नारपोली पोलीस ठाण्यासमोरील आरोग्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु असून दुपारपर्यत तो तरुण शुद्धीवर आला नसल्याने त्याचे नाव पोलिसांना कळू शकले नाही.
दरम्यान पत्रकार शर्मा आणि त्याचा मित्र कल्लूमुळे त्या तरुणाचा जीव वाचल्याची माहिती अमृत शर्मा यांनी दिली. या घटनेची नोंद नारपोली पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Conclusion:apghat
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.