ETV Bharat / state

रिक्षाचालक तरुणाचा धारदार शस्त्राने खून; पोलीस तपास सुरू - solapur crime news

मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुरेश याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. फोन आल्याने तो घरातून रिक्षा घेऊन बाहेर पडला. आणि सकाळच्या सुमारास सुरेशचा मृतदेह आढळला.

रिक्षाचालक तरुणाचा धारदार शस्त्राने खून
रिक्षाचालक तरुणाचा धारदार शस्त्राने खून
author img

By

Published : Mar 3, 2021, 5:53 PM IST

Updated : Mar 3, 2021, 6:30 PM IST

सोलापूर-सोलापूर- हैद्राबाद महामार्गावर असलेल्या मुळेगाव परिसरात एका रिक्षाचालक तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला असल्याची घटना घडली आहे .या खुनामुळे मुळेगाव परिसरात खळबळ उडाली आहे .सुरेश बबन गायकवाड (वय 26 ,रा भीम नगर,मुळेगाव,सोलापूर) असे मयत झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून लवकरच संशयीत आरोपींचा तपास केला जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

रिक्षाचालक तरुणाचा धारदार शस्त्राने खून

तरुणाच्या खुनाने परिसरात एकच खळबळ
भीमनगर(मुळेगाव) येथील तरुणाचा मृतदेह बुधवारी सकाळी मुळेगाव परिसरात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. खून झाल्याची वार्ता वाऱ्यासारखी पसरली बघ्यांची एकच गर्दी निर्माण झाली होती. सुरेश गायकवाड याच्या खुनाने भीमनगर परिसरात वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चेला उत आला होता.

तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल
मुळेगाव परिसर हे तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत येतो. तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप ,उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ प्रभाकर शिंदे हे घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू केला आहे. घटनास्थळी पंचनामा करून सुरेश गायकवाड याचा मृतदेह शवविच्छेदनसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.

खुनाचे रहस्य उलगडले नाही
सुरेश गायकवाड याचा खून कोणत्या कारणामुळे झाला याचा उलगडा अजूनही झाला नाही. यामध्ये पोलीस प्रशासन वेगवेगळ्या पद्धतीने तपास करत आहे. मयत सुरेश हा रिक्षाचालक होता. मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास सुरेश याला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. फोन आल्याने तो घरातून रिक्षा घेऊन बाहेर पडला. आणि सकाळच्या सुमारास सुरेशचा मृतदेह आढळला.

Last Updated : Mar 3, 2021, 6:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.