ETV Bharat / state

'कोरोनावर मात करण्यासाठी "योग साधना" हेच सर्वात मोठे औषध' - सोलापूर न्यूज

कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे.योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे. या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक्त बनेल, असे प्रतिपादन पतंजली योग पिठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी केले.

Yogasadhana is the great medicine to escape from the corona says  Sudha allimore
योग दिन
author img

By

Published : Jun 21, 2020, 4:44 PM IST

Updated : Jun 21, 2020, 5:30 PM IST

सोलापूर - कोरोनाच्या महामारीवर मात करण्यासाठी योग साधना हेच सर्वात मोठे औषध आहे. योग आणि प्राणायाम निरोगी आरोग्याचा मूलमंत्र आहे. या मूलमंत्राचा अंगीकार करून प्रत्येक व्यक्तीने आपल्या सार्वजनिक जीवनात वाटचाल केल्यास देश निरोगी आणि सशक्त बनेल, असे प्रतिपादन पतंजली योग पिठाच्या महिला केंद्रीय प्रभारी सुधा अळ्ळीमोरे यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पतंजली योग समितीच्यावतीने आज (रविवार) सकाळी वसंत विहार येथील पंधे उद्यानात जागतिक योगदिन साजरा करण्यात आला. यावेळी साधकांना मार्गदर्शन करताना सुधा अळ्ळीमोरे बोलत होत्या.

नियमित योग आणि प्राणायाम केल्यास मानसिक आणि शारीरिक स्वास्थ लाभते. योगामुळे मन आणि शरीर सदृढ होण्यास मदत होते. नियमित योग केल्याने तणाव दूर होण्याबरोबरच शरीरातील व्याधींपासून सुटका मिळते. मानवाच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाबरोबर अध्यात्मिक उन्नतीची परिसीमा योग साधनेतून साधता येते. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्तावाला मांडला आणि डिसेंबरमध्ये त्याला मान्यता मिळाली. २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभरात उत्साहाने साजरा करण्यात आला होता. यानिमित्ताने योगाला घराघरात पोहोचवण्याचे योगगुरू बाबा रामदेव यांचे स्वप्न पूर्ण झाल्याचे सुधा अळ्ळीमोरे म्हणाल्या.

'कोरोनावर मात करण्यासाठी "योग साधना" हेच सर्वात मोठे औषध'
भारतीय संस्कृतीतील योगाचे महत्त्व अधोरेखित होण्याचे प्रयत्न यानिमित्ताने होत आहे. यावर्षी योग दिवस कोरोनामुळे सामुहिकपणे साजरा करता आला नाही. म्हणून हा योग उत्सव पतंजली योग समिती व वेगवेगळ्या योग संघटनेच्या माध्यमातून घरीच साजरा करण्यात आला. रविवारी सकाळी ७ ते ८ या वेळेत पतंजली योग समिती महाराष्ट्रद्वारे प्रत्येक जिल्ह्यातून फेसबुक लाईव्हद्वारे हा कार्यक्रम सादर करण्यात आला.

Last Updated : Jun 21, 2020, 5:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.