ETV Bharat / state

महिला दिन विशेष : सोलापूर मध्य रेल्वे विभागात 'मर्दानी' महिला टीसींची फौज - Central Railway Division women TC news

सद्यस्थितीत महिला या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. सोलापूर मध्य रेल्वे विभागात देखील १५ महिला टीसी ड्युटी बजावत आहेत.

women's day 2021 special :  women TCs in Solapur Central Railway Division
महिला दिन विशेष : सोलापूर मध्य रेल्वे विभागात मर्दानी महिला टिसींची फौज
author img

By

Published : Mar 7, 2021, 8:54 PM IST

सोलापूर - सद्यस्थितीत महिला या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. सोलापूर मध्य रेल्वे विभागात देखील १५ महिला टीसी ड्युटी बजावत आहेत. महिलांनी आता कुणालाही न घाबरता सामर्थ्यवान झाले पाहिजे. समाजाने महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे, अशी अपेक्षा या महिला टीसींनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना व्यक्त केली.

आपल्या भावना व्यक्त करताना महिला टीसी....

समाजाने महिलांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे-
महिला या सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहेत. मात्र समाजात त्यांना म्हणावे तसे स्थान आजही दिले जात नाही. समाजाने महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. मुळात महिलांनी कुणालाही घाबरू नये. आपली बाजू ठामपणे मांडावी. महिलांवर वारंवार होणारे अत्याचार याचा विरोध केला पाहिजे. अलीकडे हुंड्याची मागणी वाढली असून यामुळे महिला आत्महत्याचे प्रमाण वाढले आहे. या जुन्या प्रथा बंद झाल्या पाहिजे, असे परखड मत महिला टीसींनी मांडले.

अनेक प्रवाशांची काळजी घेत तिकीट तपासणी-
मदारबी अदीब सय्यद यांनी बोलताना माहिती दिली की, 'ड्युटी रेल्वेतील करत असताना हजारो प्रवाशांची काळजी घेत ड्युटी किंवा तिकीट तपासणी करतो. चांगले आणि वाईट, असे दोन्ही प्रकारचे प्रवासी पाहायला मिळतात. पण अनेक कठीण प्रसंगांना तोंड देत निडरपणे ड्युटी करावी लागते.'

गुजरात येथील आयेशा आत्महत्याचा विरोधात व्यक्त केला संताप-
गुजरात येथील आयेशा या महिलेने पतीच्या त्रासाला कंटाळून आणि पैशाच्या मागणीला कंटाळून साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली. आत्महत्या पूर्वी तिने व्हिडिओ तयार केला होता. याचे पडसाद सोलापुरातील महिलांत देखील पाहावयास मिळत आहेत. मध्य रेल्वे विभागात काम करणाऱ्या महिला टीसींनी देखील या घटनेचा निषेध केला आणि हुंडा प्रथेला विरोध केला.

या आहेत महिला टीसी -

सोलापूर मध्य रेल्वे विभागात १५ महिला टीसी, तिकीट तपासणीसाठी तैनात आहेत. यामध्ये अनुप्रिया अंधेली या मुख्य तिकीट तपासणी अधिकारी, प्रीती भोसले, मदारबी सय्यद, आहिल्याबाई राठोड, प्रांजळ ताटे आदी टीसींचा समावेश आहे.

हेही वाचा - सोलापुरातील 'फार्मा गोडाऊन'ला आग, सुदैवाने जीवित हानी नाही

हेही वाचा - विनाकारण वाहने अडवून कागदपत्रे मागू नका, वाहतूक शाखेला पोलीस अधीक्षकांची तंबी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.