ETV Bharat / state

खासगी सावकाराच्या जाचाला कंटाळून 'वायरमन'ने गळफास घेऊन केली आत्महत्या - खासगी सावकार सोलापूर बातमी

शहरातील एका वायरमनने एका खासगी सावकाराकडून कर्ज घेतले होते. मात्र, लॉकडाऊन काळात हाताला काम नसल्याने हे कर्ज फेडणे त्याला शक्य झाले नाही. यानंतर पैशांच्या वसुलीसाठी सावकाराने तगादा लावला, धमक्या दिल्या. यालाच कंटाळून वायरमनने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

अहमद खान
अहमद खान
author img

By

Published : Oct 10, 2020, 8:53 PM IST

सोलापूर - शहरात पुन्हा एक सावकारी बळी गेला आहे. अहमद शब्बीर खान (वय 40, रा. कुमार स्वामी नगर मित्र नगर, हैदराबाद रोड सोलापूर) यांनी सावकाराच्या जाचाला कंटाळून शुक्रवारी रात्री राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली आहे. अहमद यांनी शुक्रवारी रात्री पत्नीला 'तू माझ्या बहिणीकडे जाऊन ये' असे सांगितले आणि पत्नी बहिणीच्या घरी गेली असता, गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

अहमद खान हे खाजगी वायरमनचे काम करत होते. अहमद खान यांनी शास्त्रीनगर येथील एका सावकाराकडून काही महिन्यांपूर्वी व्याजाने पैसे घेतले होते. दरम्यान, अचानक लॉकडाऊन लागल्याने आणि हाताला काम मिळत नसल्याने, अहमद यांनी पैसे परत देण्यासाठी विलंब झाला. यानंतर पैशांची वसुली करण्यासाठी सावकाराने वारंवार विचारणी आणि धमक्या दिल्याने, या जाचाला कंटाळून अखेर अहमद यांनी आत्महत्या केली.

जोपर्यंत शास्त्रीनगरातील खासगी सावकाराला अटक होत नाही आणि त्याच्यावर सावकारी गुन्हा दाखल करण्यात येत नाही, तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा अहमद खान यांच्या नातेवाईकांनी घेतला होता. पंरतु पोलिसांच्या अश्वासनानंतर नातेवाईकांनी शवविच्छेदनानंतर मृतदेह ताब्यात घेऊन अंतिम संस्कार केले. दरम्यान, पोलीस आयुक्तांकडून वारंवार आवाहन करण्यात येत आहे की, कोणालाही खासगी सावकारकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास आमच्याकडे तक्रार दाखल करा, आम्ही त्याच्यावर कारवाई करू, असे असूनही अद्यापही नागरिक पोलीस आयुक्तांकडे न जाता आत्महत्येसारखा मार्ग स्विकारत असल्याने मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा - 'गुन्हे घडतच असतात, त्यांना मोदी रोखू शकत नाहीत' काँग्रेस नेत्याचे बेताल वक्तव्य

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.